नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – त्र्यंबकेश्वर तालुक्यात भीषण दुर्घटना घडली आहे. हिरडी या गावात रात्रीच्या सुमारास विहीरीचे खोदकाम सुरू होते. त्यावेळी बार उडविण्यात आला. यावेळी काही कामगार विहीरीत पडले. यात ३ कामगारांचा मृत्यू झाला आहे तर १ गंभीर जखमी झाला आहे.
या दुर्घटनेत मृत्यू झालेल्यांमध्ये लहू जालिंदर महाजन (वय ३९), आबा पिनू एकनाथ बोराडे (वय ३६) आणि बिभीषण शामराव जगताप (वय ४०) यांचा समावेश आहे. या तिघांचे मृतदेह नाशिक सिव्हिल हॉस्पिटलमध्ये पोस्टमॉर्टम करण्यासाठी आज सकाळीच आणण्यात आले आहेत.
त्र्यंबकेश्वर तालुक्यातील हिरडी या गावात मंगळवारी रात्री दहा वाजेच्या सुमारास एक दुर्घटना घडली. विहीरीचे खोदकाम येथे सुरू होते. त्याचवेळी स्फोट घडवून विहीर खोदली जात होती. मात्र, अचानक या स्फोटामुळे ३ कामगार विहीरीत पडले. या तिन्ही कामगारांचा मृत्यू झाला आहे. तर १ कामगार गंभीर जखमी झाला आहे. हे चारही कामगार परप्रांतीय असल्याचे सांगितले जाते. ही दुर्घटना घडताच पोलिसांना ही बाब कळविण्यात आली. त्यानंतर अॅम्ब्युलन्स सह पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. गंभीर जखमी कामगाराला नाशिक सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. याप्रकरणी पोलिस अधिक तपास करीत आहेत.
Nashik Trimbakeshwar 3 Worker Death 1 Injured