नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – देशाच्या सीमेचे रक्षण ज्याप्रमाणे सैनिक करत असतात त्याचप्रमाणे दळणवळणाच्या माध्यमातून देशातील अर्थव्यवस्थेसाठी चालक महत्त्वपूर्ण भूमिका पार पडत असतात. त्यामुळे चालकांना समाजात सन्मानाचं स्थान निर्माण करण्याची गरज असून त्यांना सारथी म्हणून संबोधावे असे प्रतिपादन सहाय्यक परिवहन अधिकारी विलास चौधरी यांनी केली.
नाशिक जिल्हा ट्रान्सपोर्ट असोसिएशनच्या वतीने दरवर्षी १७ सप्टेंबर विश्वकर्मा जयंती व पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांचा जन्मदिन हा ‘चालक दिन’ म्हणून मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो. यंदाच्या वर्षी देखील संस्थेच्या वतीने १७ सप्टेंबर २०२४ ला गणेश विसर्जनमुळे दि. २१ सप्टेंबर २०२४ रोजी लक्ष्मीनारायण बँक्वेट हॉल एच पी गुरूनानक पेट्रोल पंपासमोर, डी मार्ट मॉल सर्व्हिस रोड,कोणार्क नगर, आडगाव शिवार,नाशिक येथे चालक दिन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या प्रसंगी ते बोलत होते.यावेळी निमाचे अध्यक्ष धनंजय म्हणाले की, नाशिक शहरातील औद्योगिक वसाहत येथील ट्रक टर्मिनल आडगाव ट्रक टर्मिनल चा विकास करण्यासोबतच नाशिक शहरातील चारही बाजूने बंद जकात नाके ट्रक टार्मिनल म्हणून विकसित करण्याची आवश्यकता असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी परिवहन निरीक्षक अधिकारी विनोद वसईकर, सहाय्यक पोलीस आयुक्त वाहतूक, सुधाकर सुराडकर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक सचिन खैरनार, मोटर मर्चंट अध्यक्ष इंद्रपाल सिंग चड्डा, पोलीस सचिन जाधव वाहतूक मित्र अंजू सिंगल, संघटनेचे अध्यक्ष राजेंद्र फड, सचिन जाधव, चंदन पवार,सुनील बुरड, जे.पी जाधव,जयपाल शर्मा,रामभाऊ सूर्यवंशी, लखा शेठ,शंकर धनावडे, सुभाष जांगडा,बजरंग शर्मा, महेंद्रसिंग राजपूत विशाल पाठक लक्ष्मण पाटील, राजन शेठ सियाराम शर्मा,हसरत शेख, ईश्वर सोनवणे, दलजीत मेहता, संजय राठी, नरेश बंसल, दीपक ढिकले सदाशिव पवार, तेजपाल सोडा, पवन क्षीरसागर, विनोद शर्मा, पोपट तांबे यांच्यासह चालक बहुसंख्येने उपस्थित होते.यावेळी संघटनेचे अध्यक्ष राजेंद्र फड यांनी नाशिक जिल्हा ट्रान्सपोर्ट असोसिएशनच्या कामकाजाचा आढावा प्रस्ताविकाच्या माध्यमातून दिला.
चालक दिनाच्या निमित्ताने २५ वर्ष सेवा बजावलेल्या १५ पुरुष चालकांचा व १० महिला चालकांचा पाच लाख रुपये अपघात विमा कवच देऊन सन्मान करण्यात आला. तसेच उपस्थित ३०० चालकांचा एक लाख रुपयाचा अपघाती विमा काढण्यात आला. यावेळी उपस्थित चालकांचे हेल्थ चेकअप करण्यात आले तसेच रक्तांची बिराचेही याप्रसंगी आयोजन करण्यात आले होते.