नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – परिवहन विभागाच्या तांत्रिक अडचणींचा सर्वाधिक फटका ट्रान्सपोर्ट उद्योगाला बसत आहे. त्यामुळे तांत्रिक अडचणी दूर करून पासिंग झालेल्या वाहनांना तातडीने फिटनेस प्रमाणपत्र द्या अन्यथा नाशिक जिल्हा ट्रान्सपोर्ट असोसिएशनच्या वतीने आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा संघटनेच्या वतीने परिवहन विभागाला देण्यात आला आहे.
गाड्या पासिंग होऊ नये गाड्यांना फिटनेस प्रमाणपत्र मिळत नसल्याने संघटनेचे अध्यक्ष राजेंद्र फड यांच्या नेतृत्वाखाली परिवहन अधिकारी प्रदीप शिंदे यांना निवेदन देण्यात आले. यावेळी सेक्रेटरी शंकर धनावडे, उपाध्यक्ष महेंदसिंग राजपूत, कोषाध्यक्ष बजरंग शर्मा, नैतिक कटीरा यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.
संघटनेच्या वतीने देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, नाशिक परिवहन विभागात वाहनांची पासिंग होत नाही आणि पासिंग झालेल्या वाहनांना फिटनेस प्रमाणपत्र वेळेत मिळत नसल्याने वाहतूकदारांना प्रचंड अडचणींचा सामना करावा लागतोय. पासिंग होऊनही फिटनेस प्रमाणपत्र प्राप्त होत नसल्याने वाहतूकदारांना आपली वाहने उभीच ठेवावी लागत आहे. वाहतूकदारांचे प्रचंड नुकसान होत आहे. यामुळे वाहतूक दरांमध्ये प्रचंड असंतोष पसरलेला असल्याचे म्हटले आहे.
तसेच नाशिक जिल्ह्यातील औद्योगिक वसाहतीत काही महिला आरटीओ अधिकाऱ्याकडून उभ्या असलेल्या वाहनांना किरकोळ ओवर लोड व चुकीच्या कारनाहून कारवाई करून सुमारे हजारो रुपयांचा दंड लावण्याचे प्रकार सुरू आहे. या अधिकाऱ्यांकडून होत असलेल्या कारवाईमुळे वाहतूकदार अधिक अडचणीत येत असून त्यांच्यात प्रचंड असंतोष पसरला आहे.
देशाच्या अर्थव्यवस्थेत महत्त्वाची भूमिका पार पाडणाऱ्या ट्रान्सपोर्ट उद्योग सततची होणारी डिझेल वाढ इन्शुरन्सच्या वाढता किंमती, वाहनांच्या वाढत्या किंमती होत असलेला खर्च यामुळे अधिक अडचणीत सापडला आहे. त्यामुळे या उद्योगाकडे येणाऱ्यांचा कल देखील कमी होत आहे. अडचणीत आलेल्या उद्योगाला वाचवण्यासाठी प्रयत्न होण्याची नितांत आवश्यकता आहे. मात्र नाशिक जिल्ह्यात महिला आरटीओकडून होत असलेल्या चुकीच्या कारवाईमुळे येथील माल वाहतूकदार अडचणीत सापडले आहे.
परिवहन विभागाने या होत असलेल्या कारवाईबाबत पडताळणी करून वाहतूकदारांवर कुठल्याही चुकीच्या कारवाई होणार नाही याची दक्षता घेण्याची गरज आहे. त्यामुळे नाशिक औद्योगिक वसाहतीत वाहतूकदारांवर होत असलेली कारवाया तातडीने थांबविण्यात यावी अन्यथा वाहतूकदारांच्या रोशाला प्रशासनांला सामोरे जावे लागेल असा इशारा देण्यात आला आहे.