त्र्यंबकेश्वर (इंडिया दर्पण वृत्तसेवा) पर्यटनस्थळावर हुल्लडबाजी करणाऱ्या टवाळखोरांना वनविभागाच्या सुरक्षारक्षकांनी दिल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. घोटी मार्गावरील पहिणे गावातील काल दुपारी चार वाजेची ही घटना आहे. नेकलेस धबधब्यावर धिंगाणा घालत ही हुल्लडबाजी सुरु होती. त्यात काही टवाळखोर मद्यसेवनही करत असल्याचेही बोलले जात आहे. यावेळी सुरक्षारक्षकांनी चोप दिला.
शनिवार आणि रविवार असे दोन्ही दिवस त्र्यंबकेश्वर तालुक्यात पर्यटकांची मोझी गर्दी होती. पहिणे परिसरात शेकडो चारचाकी, दुचाकींची गर्दी झाली होती. पेगलवाडी फाट्यावर त्र्यंबक पोलीसांनी तर पहिणे बारीत वाडीवर्हे पोलीसांनी बंदोबस्त लावल्यामुळे ट्रॅफीक जॅम झाली नाही. वाडीवर्हे पोलीसांनी वाहनांची तपासणी करीत दारुच्या बाटल्या पकडल्या व पर्यटकांनाच दारु ओतुन देण्यास भाग पाडले. नेकलेस धबधब्याजवळ पर्यटकांमध्ये हाणामारीचीही घटना घडली. काही टवाळखोरांकडे लोखंडी राॅड, गुप्ती सारखे हत्यारंही असल्याचे समजले. अनेक पर्यटकांनी ठिकठिकाणी धबधब्याखाली भिजण्याचा तसेच नदीच्या पाण्यात बसण्याचा आनंद घेतला.
भाजलेले मक्याचे कणसं आणी वाफाळत्या चहाची तडाखेबंद विक्री झाली. नेकलेस धबधब्या परिसरात जाण्यासाठी वनविभागातर्फे प्रवेश शुल्क घेण्यात आले. गर्दिच्या मानाने पोलीसांचा बंदोबस्त तोकडा होता. काही तरुणाईने नशापाणी करुन धुडगुस घातल्याने परिवारा सोबत निसर्गाचा आनंद घेण्यासाठी आलेल्या महिलांनी नाराजी व्यक्त केली. त्र्यंबकेश्वर पो. स्टे. चे पो.नि. बिपीन शेवाळे यांचे मार्गदर्शनाखाली पो.ऊ.नि. जगताप, पो.ह. रुपेशकुमार मुळाणे व सहकार्यांनी तर वाडीवर्हे पो.स्टे. चे पो. नि. समीर बारवकर यांचे मार्गदर्शनाखाली पो.ह. मांडवदे, निलेश मराठे, बोराडे, विक्रम काकड, निंबेकर, होमगार्ड शहाणे, जिल्हा वाहतुक शाखेचे खैरे आदींनी चोख बंदोबस्त ठेवला होता.