नाशिक – शहर परिसराह जिल्ह्यात कालपासून पावसाचा जोर आहे. आज दिवसभर नाशिक शहर परिसरात जोरदार पाऊस होण्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. तर, गंगापूर धरण परिसरात पावसाची संततधार सुरू असल्याने धरणातून पाण्याचा विसर्ग टप्प्याटप्याने वाढविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. गंगापूर धरणातून दुपारी १ वाजता एकूण ६००० क्युसेक्स विसर्ग करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी दिली आहे. आज पहाटेही नाशकात मुसळधार पाऊस झाला आहे. दिवसभर पाऊस होणार असल्याने गोदावरीला पूर येणार असल्याचे स्पष्ट होत आहे.