नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – नाशिक तालुक्यातील अवैधरित्या गौणखनिज उत्खननाबाबत जप्त करण्यात आलेल्या स्थावर मालमत्तेची शुक्रवार 8 सप्टेंबर 2023 रोजी जाहीर लिलावाने विक्री करण्यात येणार आहे. याकरीता जास्तीत जास्त ईच्छुक व्यक्ती व संस्थांनी लिलावात भाग घ्यावा. असे असे आवाहन नाशिकच्या तहसीलदार रचना पवार यांनी केले आहे.
तहसिलदार नाशिक यांनी अनधिकृत गौणखनिज उत्खननाबाबत जप्त करण्यात आलेली स्थावर मालमत्ता ही मिळकतदार बाबुराव निवृत्ती मोजाड, राहणार शिंगवे बहुला, नाशिक यांची असून मिळकतीचा गट क्रमांक 157/3 क्षेत्र 0.19.00 आर. चौ.मी असा आहे. बाबुराव निवृत्ती मोजाड यांनी दंडात्मक कार्यवाही आदेशातील रक्कम शासनास जमा न केल्यामुळे त्यांच्या स्थावर मालमत्ता जप्ती केलेल्या मिळकतीचे जाहिर लिलावाद्वारे विक्री करून दंडात्मक रक्कम वसूल करण्यात येणार आहे.
सदर मिळकतीचा लिलाव 8 सप्टेबर 2023 रोजी सकाळी 11.30 वाजता किंवा दुपारी 3.00 वाजता तहसिल कार्यालय नाशिक, जिल्हाधिकारी कार्यालय आवार, नाशिक येथे होणार आहे. लिलावातील अटी व शर्ती, लिलावात असलेली मालमत्ता, लिलावात हातची किंमत (UPSET PRICE) इत्यादी बाबत तहसिलदार नाशिक यांच्याशी संपर्क साधावा. असेही तहसीलदार रचना पवार यांनी कळविले आहे.
Nashik Tehsildar Mining Seized Property Auction
Revenue Department Tax