नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – १५ लाखांची लाच स्वीकारल्याच्या प्रकरणात तहसीलदार नरेशकुमार बहिरम यांच्या न्यायालयीन सुनावणी दरम्यान वकिलांनी युक्तिवाद करतांना बहिरम यांनी लाच स्वीकारली नाही तर त्यांच्या गाडीत बॅग टाकण्यात आल्याचे सांगितले. या युक्तीवादातून एसीबीच्या कारवाईवर संशय व्यक्त करण्यात आला. या प्रकरणात आलेल्या ट्विस्टमुळे पत्रकारांशी बोलतांना एसीबीनेही बहिरम यांच्या सांगण्यानुसारच डिक्कीत बॅग ठेवण्यात आल्याचे सांगितले आहे.
तहसीलदार नरेशकुमार बहिरम यांना एसीबीने अटक केल्यानंतर मंगळवारी पुन्हा न्यायलायत हजर करण्यात आले. यावेळी न्यायाधीश मलकापत्ते रेड्डी यांनी बहिरम यांना आणखी दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. ही पोलीस कोठडी सुनावल्यानंतर बहिरम यांच्या वकिलांनी बहिरम यांनी लाच स्वीकारली नाही तर त्यांच्या गाडीत बॅग टाकण्यात आल्याचा युक्तिवाद केला.
बहिरमच्या निलंबनाचा प्रस्ताव शासनाकडे
जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी बहिरम याच्या चौकशीसाठी उपजिल्हाधिकारी नितीन मुंडावरे यांच्या अध्यक्षतेखाली पाच अधिकाऱ्यांचे तपासी पथक तयार केले आहे. त्याचप्रमाणे पोलिस कोठडीनंतर त्यांच्या निलंबनाबाबतचा प्रस्ताव शासनाकडे पाठवण्यात आला आहे. त्याचप्रमाणे जिल्हाधिकारी कार्यालयातील संजय गांधी निराधार योजनेच्या तहसीलदार रचना पवार यांच्याकडे नाशिक तहसील कार्यालयाच्या पदभाराची सूत्रे सोपवण्यात आली आहेत.
nashik tehsildar bahiram acb trap advocate court
Bribe Corruption