नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – टॅक्स प्रॅक्टिशनर असोसिएशन, नाशिक या संस्थेची १० वी वार्षिक सर्वसाधारण सभा नाईस सभागृहामध्ये खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली. या बैठकीत नवीन कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. संस्थेच्या अध्यक्षपदी संजय सोनवणे, उपाध्यक्षपदी अक्षय सोनजे तर सचिव पदी नितीन फिरोदिया यांची एकमताने निवड करण्यात आली.
सभेच्या सुरुवातीला टॅक्स प्रॅक्टिशनर असोसिएशन मधील दिवंगत सभासद व कुटुंबीयांना श्रद्धांजली अर्पण करून सभेस सुरुवात करण्यात आली. मागील वार्षिक सर्वसाधारण सभेचे इतिवृत्तास सर्वांनी अनुमती देऊन कायम केले. यावेळी मागील वर्षातील संस्थेच्या कामकाजाचा आढावा मावळते अध्यक्ष राजेंद्र बकरे यांनी सभासदांसमोर सादर केला. विद्यमान अध्यक्ष राजेंद्र बकरे यांनी आपला पदभार नवनिर्वाचीत अध्यक्ष संजय सोनवणे यांच्याकडे सोपवला. सूत्रसंचालन जयप्रकाश गिरासे यांनी तर आभार प्रदर्शन नितीन फिरोदिया यांनी केले यानंतर सभेची सांगता करण्यात आली.
अशी आहे नवी कार्यकारिणी
अध्यक्ष
संजय सोनवणे
उपाध्यक्ष
अक्षय सोनजे
सचिव
नितीन फिरोदिया
सहसचिव
संदीप गाढवे
खजिनदार
प्रकाश विसपुते
संघटक
मनोज धाडीवाल
कमिटी सभासद
नितीन डोंगरे, रवी चोपडा, निखिल देशमुख, योगेश कातकाडे, अनिकेत कुलकर्णी, सचिन येवलेकर व प्रशांत उशीर
Nashik Tax Practitioners Association New Body Declared