नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – टॅक्स प्रॅक्टिशनर्स असोसिएशन, नाशिकच्यावतीने कर सल्लागारांकरिता आयोजित टिपीएएन बॉक्स क्रिकेट लिगमध्ये देशमुख लायन्सने विजेतेपद पटकावले तर जीएसटी लिजन्टस हे उपविजेते ठरले.
मुंबई नाका येथील बॉक्स क्रिकेट टर्फ वरती आयोजित स्पर्धेत देशमुख लायन्स या संघाने अंतिम फेरीत जीएसटी लिजन्टस संघाशी अटीतटीच्या लढतीत विजेतेपद पटकावले. कर सल्लागार सुनील देशमुख यांनी संघाच्या वतीने विजेतेपदाचे पारितोषिक स्वीकारले तर जीएसटी लिजन्टस यांना उपविजेताचे पारितोषिक प्रदान करण्यात आले. सामना अतिशय चुरशीचा झाल्याने विजेतेपद कोण जिंकणार याकडे सर्वजण उत्सुकतेने पाहत होते. *स्पर्धेतील उत्कृष्ट खेळाडू व फलंदाजचा किताब एसजीएसटीचे अमोल लोणकर यांनी पटकावला तर उत्कृष्ट गोलंदाज हे कर सल्लागार हुकुमचंद पाखले ठरले उत्कृष्ट झेलचा किताब एसजीएसटीचे चेतन उगले* यांना प्रदान करण्यात आला.
स्पर्धेत एकूण 12 संघांनी सहभाग घेतला होता यात *जी एस टी च्या सेंट्रल व स्टेट कार्यालयाने आपल्या संघाचा सहभाग नोंदविला. स्पर्धा यशस्वीतेसाठी संदीप सपकाळ, एल के पी फायनान्शियल, पॉलिसी बाजार यांचे मोलाचे सहकार्य लाभले तर असोसिएशनचे पदाधिकारी अक्षय सोनजे, प्रकाश विसपुते, निखिल देशमुख तसेच प्रशांत उशीर कमलेश सानप, मुकेश कोठावदे, आदींनी परिश्रम घेतले.
खेळाडूवृत्तीला चालना
राज्य वस्तू व सेवा कर विभागाचे सहाय्यक आयुक्त मच्छिंद्र दोंदे म्हणाले की, टॅक्स प्रॅक्टिशनर्स असोसिएशन नाशिकच्या वतीने आयोजित बॉक्स क्रिकेट स्पर्धेचा उपक्रम अतिशय नियोजनपूर्वक व उत्तमरित्या केले होते यानिमित्ताने सर्व कर सल्लागारांना तसेच वस्तू व सेवा कर विभागातील अधिकारी, कर्मचारी यांना एकत्र येता आले अतिशय उत्साही वातावरणात खेळाडू वृत्तीने सर्व सामने पार पडले अशा प्रकारच्या विविध स्पर्धांचे तसेच उपक्रमाचे आयोजन केले पाहिजे असे प्रतिपादन श्री दोंदे यांनी यावेळी केले.
याप्रसंगी असोसिएशनचे अध्यक्ष राजेंद्र बकरे म्हणाले की, कर सल्लागार हे व्यावसायिक- व्यापारी तसेच उद्योजकांना नियमित सेवा देण्यात व्यस्त असतात त्यांचे कामकाज ठरलेल्या मुदतीत पूर्ण करून देण्यासाठी ते कायमच प्रयत्नशील असतात. जीएसटी कायदा, इन्कम टॅक्स व इतर प्राधिकरण यांच्या वेळोवेळी पूर्ण करावयाच्या कामकाजाच्या तारखा ह्या एका मागे एक सातत्याने येत असतात. यामुळे कर सल्लागारांना आपले वैयक्तिक कामकाज तसेच व्यक्तिगत आयुष्य बाजूला ठेवून आपल्या क्लायंटला, व्यावसायिकांना सेवा पुरविण्या करिता सतत व्यस्त अशा जीवनशैलीत अडकून राहावे लागते. असे होत असताना कर सल्लागार आपल्या जीवनशैली कडे पाहिजे त्या प्रमाणात लक्ष देत नाही. सतत कार्यालयीन कामकाजाचा ताण-तणाव, शारीरिक श्रमाच्या अभाव यामुळे शरीरावर विपरित परिणाम होत असतात, असे बकरे म्हणाले.
बकरे पुढे म्हणाले की, प्रत्येक कर सल्लागार हा आपल्या क्लाइंट चे व्यवसायिकांची नियोजित वेळेत कामकाज पूर्ण करून देण्याची जबाबदारी स्वीकारतो आणि त्याप्रमाणे काम करत असतो. याचप्रमाणे आपण आपल्या व्यक्तिगत आयुष्यात देखील समतोल राखणे महत्त्वाचे आहे त्यांनीही आपली व कुटुंबाच्या जबाबदारीची जाणीव ठेवून आयुष्यातील प्रत्येक गोष्टीचा आनंद घेतला पाहिजे. याच अनुषंगाने दैनंदिन व्यस्त कामकाजातून वेळ काढून कर सल्लागार यांना आनंद घेता यावा यासाठी टॅक्स प्रॅक्टिशनर्स असोसिएशन, नाशिकच्या वतीने बॉक्स क्रिकेट लीगचे आयोजन करण्यात आले. असे प्रतिपादन असोसिएशनचे अध्यक्ष राजेंद्रजी बकरे यांनी यावेळी केले.
Nashik Tax Practitioners Association Cricket Tournament