नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – दैनंदिन व्यस्त कामकाजातून वेळ काढून कर सल्लागार यांना आनंद घेता यावा यासाठी टॅक्स प्रॅक्टिशनर्स असोसिएशन, नाशिकच्या वतीने बॉक्स क्रिकेट लीगचे आयोजन करण्यात आले, असे प्रतिपादन असोसिएशनचे अध्यक्ष राजेंद्रजी बकरे यांनी यावेळी केले. या क्रिकेट लीगचे यशस्वीरित्या आयोजन करण्याकरिता टॅक्स प्रॅक्टिशनरस चे सर्व पदाधिकारी सभासद यांचे मोलाचे सहकार्य लाभले.
बकरे पुढे म्हणाले की, कर सल्लागार हे व्यावसायिक- व्यापारी तसेच उद्योजकांना नियमित सेवा देण्यात व्यस्त असतात त्यांचे कामकाज ठरलेल्या मुदतीत पूर्ण करून देण्यासाठी कायमच प्रयत्नशील असतात. जीएसटी कायदा, इन्कम टॅक्स व इतर प्राधिकरण यांचे वेळोवेळी पूर्ण करावयाच्या कामाच्या तारखा ह्या एका मागे एक सातत्याने येत असतात यामुळे कर सल्लागारांना आपले वैयक्तिक कामकाज तसेच व्यक्तिगत आयुष्य बाजूला ठेवून आपल्या क्लायंटला, व्यावसायिकांना सेवा पुरविण्या करिता सतत व्यस्त जीवनशैलीतच राहावे लागते. असे होत असताना कर सल्लागार आपल्या जीवनशैली कडे पाहिजे त्या प्रमाणात लक्ष देत नाही. सतत कार्यालयीन कामकाजाचा ताण-तणाव, शारीरिक श्रमाच्या अभाव यामुळे शरीरावर विपरित परिणाम होत असतात. प्रत्येक कर सल्लागार हा आपल्या क्लाइंट चे व्यवसायिकांची नियोजित वेळेत कामकाज पूर्ण करून देण्याची जबाबदारी स्वीकारतो आणि त्याप्रमाणे काम करत असतो. याचप्रमाणे आपण आपल्या व्यक्तिगत आयुष्यात देखील समतोल राखणे महत्त्वाचे आहे त्यांनीही आपली व कुटुंबाची जबाबदारीची जाणीव ठेवून आयुष्यातील प्रत्येक गोष्टीचा आनंद घेतला पाहिजे, असे बकरे म्हणाले.
Nashik Tax Practitioner Association Box Cricket League