नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – मनुष्य शरीर दुर्मिळ असुन क्षण भंगुर आहेत. या शरीराचा कोणताही भरोसा नाही. त्यामुळे जोपर्यंत शरीरात प्राण आहे, तो पर्यंत भगवंताचे भजन करावे. ज्या ठिकाणी राम कथा सुरू असते त्या ठिकाणी हनुमान प्रकट रूपात उपस्थित असतात तुलसीदासांना हनुमान भेटले असल्याचे विचार पूज्य भाईश्री रमेशभाई ओझा यांनी व्यक्त केले.
वै. परमपूज्य योगिराम तुकाराम बाबायांच्या सुवर्णमहोत्सवी पुण्यतिथीनिमित्त प्रभू रामचंद्रांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या पुण्यभूमी नाशिकच्या पंचवटीतील तपोवनात सुरू असलेल्या राम कथेत रविवारी दुसऱ्या दिवशी भाईश्री बोलत होते. ते म्हणाले की, भगवंतामुळे मानवी जीवनाचे कल्याण होते . जेथे राम कथा होते तेथे हनुमान राम कथा श्रवण करण्यासाठी येतात हनुमानाची उपासना चिरंजीव आहे. मनुष्य ही एक परमात्म्याची अद्भुत रचना आहे. गर्भात काय आहे हे विज्ञानातून आपल्याला माहिती होते. घरी रामायण भागवत वाचन करायला पाहिजे मनुष्य शरीरासारखे दुसरे श्रेष्ठ असे कोणतेही शरीर नसल्याचे भाईश्रीनी सांगितले. यावेळी मथुरा येथील शरणनंदजी महाराज यांची प्रमुख उपस्थिती होती.
आरती प्रादेशिक परिवाहन आधिकारी प्रदीप शिंदे, सह प्रादेशिक परिवाहन आधिकारी वासुदेव भगत, गो रक्षक नेमिचंदभाई पोद्दार महेशभाई मजेठिया श्पुरुषोत्तम आव्हाड, श्रीमती रूपाली जोशी, डि बी पटेल, प्रभुजी महाराज रामबिलास बूब यांच्या हस्ते आरती करण्यात आली. यावेळी द्वारकानाथ राठी, महेश राठी, देवेश राठी महंत उमेश महाराज माधवदास महाराज राठी, यांच्यासह भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Nashik Tapovan Ramkatha Dnyanyadnya Rameshbhai Ojha