नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – तलाठी भरतीच्या ऑनलाईन परीक्षेत हायटेक कॉपीचा प्रकार येथे उघड झाला आहे. म्हसरुळ पोलिस ठाण्याच्या हद्दीत दिंडोरी रोडवरील एका परिक्षा केंद्रावर एका संशयास्पद व्यक्तीला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्याच्याकडे वाकीटॅाकी, दोन मोबाईल एक टॅब व श्रवणयंत्र आढळून आले. त्याच्या मोबाईलची तपासणी केल्यानंतर या परिक्षेतील प्रश्नाचे फोटो आढळून आले. पोलिसांनी या व्यक्तीला ताब्यात घेतले असून त्याच्या साथीदाराचा शोध घेतला जात आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
गुरुवारी सकाळी नऊ वाजेपासून आजा राज्यात ही परीक्षा सुरु झाली. परीक्षेच्या पहिल्याच दिवशी पेपर फुटल्याची चर्चा राज्यभर सुरू आहे. नागपूरमधूनही पेपर सुरू होताच प्रश्नपत्रिकांचे फोटो बाहेर पाठवण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. राज्यात यंदा चार वर्षांनंतर तलाठी भरती परीक्षा होत आहे. यासाठी दहा लाखांहून अधिक उमेदवारांनी अर्ज केला आहे. गुरुवार १७ ऑगस्टपासून राज्यातील विविध केंद्रांवर या परीक्षेला सुरुवात झाली. सकाळी नऊ वाजता पहिल्या पाळीतील परीक्षा होती. त्यात हा गैरप्रकार आढळला.
तलाठी भरती परिक्षेच्या पहिल्याच दिवशी नाशिकमध्ये पेपर फुटल्याची घटना घडली. म्हसरुळच्या परिक्षा केंद्राबाहेर ताब्यात घेतलेल्या संशयिताकडे पोलिसांना टॅब, दोन मोबाईल, वाॅकीटाॅकी, हेडफोन्स सापडले. अधिकची
तपासणी केली असता मोबाईलमध्ये पेपरमधील प्रश्नांचे फोटो आढळून आले. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू असल्याची माहिती पोलीस उपायुक्त किरणकुमार चव्हाण यांनी दिली आहे.
टाटा कन्स्लटन्सी संस्थेमार्फत राज्यात ३६ जिल्ह्यांमध्ये आजपासून भरती पेपर प्रक्रीया सुरु झाली. नाशिक जिल्ह्यात जवळपास ८० हजार जणांनी अर्ज केला आहे. जिल्ह्यातील ११ केंद्रांवर ही परीक्षा होत आहे. त्यामध्ये नाशिक शहरातील आठ केंद्रांचा समावेश आहे. येवला, सिन्नर व त्र्यंबकेश्वर येथील प्रत्येकी एका केंद्रावर परीक्षा होत आहे. पहिल्या टप्यात २२ हजार ३०० उमेदवार परीक्षा देणार आहेत.
नाशिक शहरातील म्हसरूळच्या केंद्रावर सकाळी ९ च्या सुमारास पहिल्या टप्यातील पहिल्या पेपरला प्रारंभ झाला. त्याचवेळी केंद्रा बाहेर एक संशयित असल्याची तक्रार म्हसरूळ पोलीसांकडे प्राप्त झाली. त्यानुसार
पोलीसांनी सदर संशयिताची तपासणी केली असता त्याच्याकडे विविध साहित्य आढळून आले. त्यामध्ये टॅब, दोन मोबाईल, वाॅकीटाॅकी, हेडफोन्सचा समावेश आहे. तसेच सदर युवकाच्या मोबाईलमध्ये पेपर मधील प्रश्नांची फोटो
पोलीसांना सापडले. पोलीसांनी संशयिताला ताब्यात घेतले असून त्याच्याकडील साहित्य जप्त केले आहे. या प्रकरणी म्हसरूळ पोलीसांकडून गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. या घटनेमुळे सर्वत्र एकच खळबळ उडाली आहे.
या कॉपी केसबाबत नाशिक पोलिसांनी दिलेली माहिती अशी
As soon as the Nashik Talathi paper starts, the pictures of the question papers are out
nashik talathi Post Recruitment Exam High tech Copy Case Police Mhasrul Revenue Department