नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा): करमणूक कर शुल्काच्या दंडात्मक रकमेपोटी जप्त केलेल्या मौजे नाशिक शहर येथील हॉटेल साईसिद्धी प्रा.लि. यांच्या मालकीच्या स.नं. 910/2/1/1 क्षेत्र 91.54.50 आर चौ.मी., स.नं. 910/2/1/2/1/1 क्षेत्र 80.00.00 आर चौ.मी. व स.नं. 910/2/1/2/1/2 क्षेत्र 11.72.00 आर चौ.मी. अशा एकूण तीन वाणिज्य प्रयोजनार्थ बिनशेती स्थावर मालमत्तेची जाहीर लिलावद्वारे विक्री केली जाणार आहे.
हा लिलाव 27 जानेवारी 2025 रोजी सकाळी 11.30 वाजता तहसीलदार कार्यालय, नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात होणार आहे, अशी माहिती तहसीलदार डॉ. शोभा पुजारी यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये दिली आहे.
जप्त करण्यात आलेल्या हॉटेल साईसिद्धी प्रा.लि. यांच्या तीनही मालमत्तेची सरकारी किंमत रूपये 43 कोटी 25 लाख 5 हजार 400 इतकी आहे. सदर लिलावात आदिवासी/ बिगर आदिवासी व इतर सर्व प्रवर्गातील व्यक्ती/ संस्था यांना भाग घेता येईल, असे प्रसिद्धीपत्रकात नमूद करण्यात आले आहे.