नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – नाशिक तालुक्यात नाशिक येथे अपर तहसील कार्यालय स्थापन करणे व त्याअनुषंगाने पुढील प्रमाणे पद मंजुरीस व अन्य अनुषंगिक बाबीस या शासन निर्णयान्वये आज मान्यता देण्यात आली आहे.
या शासनमान्य निर्णय़ामध्ये म्हटले आहे की, नाशिक जिल्ह्यातील नाशिक तालुक्याची लोकसंख्या जिल्ह्यातील इतर तालुक्यांपेक्षा जास्तीची असुन सन २०११ च्या तुलनेत सरासरीने दुप्पट आहे. लोकसंख्येच्या प्रमाणात जमिन खरेदी-विक्री व्यवहाराच्या अनुषंगाने होणाऱ्या नोंदी, तद्नुषंगीक दावे, कोर्ट केसेस, विविध प्रकारच्या परवानग्या विषयक कामकाजात सदर तालुक्यात वाढ झालेली आहे. सध्याच्या तहसील कार्यालयातील प्रचंड कामकाज, लोकसंख्यावाढीमुळे तालुक्याचा दिवसेंदिवस होणारा भौगोलीक व औद्योगिक विस्तार यामुळे नाशिक तहसील कार्यालयावर मोठ्या प्रमाणात प्रशासकीय ताण पडत आहे. यासर्व बाबी विचारात घेऊन प्रशासकीय व स्थानिक नागरिकांच्या सोयीच्या दृष्टीने नाशिक जिल्ह्यातील नाशिक तालुक्यातील नाशिक येथे स्वतंत्र अपर तहसील कार्यालय स्थापन करुन त्याकरीता आवश्यक पदांची निर्मिती करण्याबाबतचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन होता.
या निर्णयात नाशिक तहसील कार्यालय बळकट करण्याच्या दृष्टीने अपर तहसीलदार नाशिक यांच्या नवीन कार्यालयासाठी खालील ४ पदे नियमित वेतनश्रेणीवर मंजुर करण्यास शासन मान्यता देण्यात येत आहे, तसेच सदर पदे ही सध्याच्या त्या-त्या संवर्गाचा एक भाग राहतील. असे म्हटले आहे.
तहसिल कार्यालय – एकुण ५ मंडळे – माडसांगवी, शिंदे, गिरणारे, भगुर, महिरावणी – महसुली गावे ७५
अप्पर तहसिल कार्यालय – एकुण ५ मंडळे – नाशिक, सातपूर, देवळाली, मखमलाबाद, पाथर्डी- महसुली गावे ३३