नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – स्विमिंग फेडरेशन ऑफ इंडिया च्या मान्यतेने महाराष्ट्र राज्य हौशी जलतरण संघटने तर्फे आयोजित करण्यात आलेल्या राज्यस्तरीय मास्टर जलतरण स्पर्धेत विविध वयोगटात १९५ जलतरणपटूंनी भाग घेतला होता. त्यामध्ये नाशिकच्या निंबाळते कुटुंबातील पितापुत्रांनी १६ पदकांची कमाई केली आहे.
राजेंद्र निंबाळते- यांनी एकूण ५ मेडल ५० मी,१०० मी बॅकस्ट्रोक प्रकारात प्रथम व ५० मी बटरफ्लाय प्रकारात द्वितीय व ४x५० फ्रीस्टाइल व मेडले रिले प्रकारात प्रथम
आशिष राजेंद्र निंबाळते- एकूण ६ मेडल ५० मी,१०० मी बॅकस्ट्रोक २०० मी व्यक्तिक मेडले प्रकारात प्रथम व १०० मी फ्रीस्टाइल मधे द्वितीय व ४x५० फ्रीस्टाइल व मेडले रिले प्रथम
निनाद राजेंद्र निंबाळते- एकूण ५ मेडल ५० मी फ्रीस्टाइल,५० मी बटरफ्लाय व २०० मी व्यक्तिक मेडले मधे प्रथम व ४x५० मी फ्रीस्टलाय व मेडले रिले मधे प्रथम
राजेंद्र निंबालते हे नाशिक मध्ये नावाजलेले जलतरण प्रशिक्षक असून त्यांनी अनेक जलतरणपटू घडविले आहे. सेवानिवृत्ती नंतर त्यांनी स्वा. वीर सावरकर जलतरण तलाव येथे आपल्या दोन्ही मुलासमवेत जलतरण पटू घडविण्याचे कार्य सुरुच ठेवले आहे.