नाशिक : केंद्राच्या ग्रीन-फिल्ड महामार्ग संकल्पनेनुसार चेन्नई-सुरुत ग्रीन फिल्ड सहा पदरीकरण महामार्गाच्या सादरीकरणाला गेल्यावर्षी नोव्हेंबर महिन्यात मंजुरी मिळाली आहे. या अंतर्गत सुरत ते चेन्नई हे १६०० किलोमीटरचे अंतर अवघे १२५० किलोमीटर वर येणार आहे. हा महामार्ग नाशिक जिल्ह्यातील काही तालुक्यांमधून जाणार असल्याने नाशिक – सुरत दरम्यानचे अंतर अवघे १७६ किलोमीटरवर येणार असून सदर महामार्गासाठी जमिनी अधिग्रहण करण्याच्या कामाला गती मिळाली आहे. याबाबत नुकतीच भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण (NHAI) ची बैठक पार पडली असून महामार्गात येणाऱ्या जमिनी हस्तांतरणाला सुरुवात झाल्याने या महामार्गाच्या कामाला गती मिळाली आहे.
महामार्ग सादरीकरणासह सहापदरीकरणाला मंजुरी मिळाल्यानंतर यासाठी जमिनी हस्तांतरणाच्या कामाला सुरुवात झाली आहे. हा महामार्ग पुर्णत्वास आल्यानंतर नाशिक ते सुरत या दोन मुख्य शहरांमधील अंतर कमी होणार आहे. हा मार्ग ग्रीनफिल्ड अंतर्गत सुरत-नाशिक-अहमदनगर-कर्माळा-सोलापूर-कर्नल-कडप्पा-चैन्नई असा तयार करण्यात येणार आहे. यामुळे दोन मुख्य शहरांना जोडणाऱ्या या मार्गातील अंतर ३५० किलोमीटरने कमी होणार असून सहा पदरीकरणामुळे वेळेची देखील बचत होणार आहे. नुकतीच महामार्गासाठी जमिनी अधिग्रहण करण्यासंदर्भात राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या NHAI च्या अधिकाऱ्यांशी बैठक पार पडली आहे.
दरम्यान हा महामार्ग नाशिक जिल्ह्यातून १७६ किलोमीटर अंतर कापणार आहे. या अंतर्गत सुरगाणा-पेठ-दिंडोरी-नाशिक-निफाड-सिन्नर या सहा तालुक्यातून जाणार आहे. जवळपास १२२ किलोमीटर हा महामार्ग जिल्ह्यातून जाणार असून ६९ गावांपासून हा महामार्ग जाणार आहे. नव्याने होणारा हा महामार्ग महत्त्वाकांक्षी असणार आहे. सुरगाणा, पेठ, दिंडोरी या तालुक्यांमधील वनविभागाच्या जमीन हस्तांतरणाच्या प्रक्रिया पार पडल्याअसून प्रत्यक्ष हस्तांतरणाला सुरुवात झाली आहे. लवकरच प्रत्यक्ष महामार्ग अस्तीत्त्वात येणार असल्याची माहिती बैठकीत देण्यात आली. भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण (NHAI) ची बैठक उपमहाप्रबंधक एम.एस. कुमार यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या बैठकीला आर. के. पांडे, महाबीर सिंग, मनोज कुमार, श्रीमान अलोक, एस. एस. सांधू आदी पदाधिकारी उपस्थित होते.