इंडिया दर्पण विशेष लेखमाला
– गोदाकाठचे वैभव –
श्री सुंदर नारायण मंदिर
गोदावरी नदी काठी असलेल्या नाशिक नगरीत अनेक ऐतिहासिक वास्तू आहेत. हे गोदाकाठचं वैभव नक्की काय आहे, हे आपण या लेखमालेतून जाणून घेत आहेत. आज आपण श्री सुंदर नारायण मंदिराविषयी जाणून घेऊया…
सुंदरनारायण मंदिरात २० ते २१ मार्चला सूर्याचे पाहिले किरण नारायण भगवानाच्या चरणावर पडते. अश्या स्वरूपाचा उल्लेख बॉम्बे प्रेसिडेन्सी नाशिक गेझेटियर १८८३ मध्ये नमूद आहे.
श्री सुंदर नारायण मंदिर हे गोदावरी तटावर आहे. या मंदिराची बांधणी १७५६ मध्ये गंगाधर चंद्रचूड यांनी केली होती. मंदिरात श्रीविष्णूच्या डावी-उजवीकडे लक्ष्मी व सरस्वतीच्या मूर्ती आहेत.
श्री कपालेश्वर मंदिराच्या द्वारपासून सुंदर नारायण मंदिराकडे पाहिल्यास मंदिरातील दिवा पूर्वीच्या काळात स्पष्टपणे दिसत असे.
औरंगजेबच्या काळात सुंदर नारायण मंदिर उद्धवस्त करण्यात आलेले होते. त्यावर स्मशानभूमी तयार झाली.
सन १७५० मध्ये पेशवा बालाजी यांनी सदर स्मशानभूमीचे शुद्धीकरण करून जागा स्वच्छ केली. मंदिरातील पूर्व दरवाजा येथे देवनागरी लिपीत नमूद आहे की, सदर मंदिर गंगाधर यशवंत चंद्रचूड यांनी १७५६ मध्ये १० लाखात बांधले. २० मार्च आणि २१ मार्चच्या निमित्ताने झालेले स्मरण..
Nashik Sundar Narayan Temple 20 21 march by Devang Jani