नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – येथील जगप्रसिद्ध सुला वाइन यार्डस कंपनी सार्वजनिक सार्वजनिक ऑफर तथा आयपीओ बाजारात आणणार आहे. यासाठी कंपनीने बाजारपेठ बाजार नियामक सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया (सेबी) कडे कागदपत्रे सादर केली आहेत. सुला कंपनी ही शेअर बाजारात सुचीबद्ध होणारी पहिली वाईन उत्पादक कंपनी असू शकते असा दावा केला जातो आहे.
याशिवाय अल्कोहल आणि स्पिरिट सेगमेंटमध्ये आयपीओ आणणारी दुसरीच कंपनी ठरणार आहे.
ऑफीसर्स चॉईस व्हिस्की बनवणारी अलॉईड ब्लेंडर्स अँड डिस्टिलर्स यांनी देखील गेल्या महिन्यात आयपीओसाठी अर्ज केला आहे. मुळची सुला वाईन ही कंपनी बेल्जियम असून त्यांनी 2010 पासून सुलामध्ये बँक केली आहे. सुला वाईन कंपनीने ई-फायलिंगच्या द्वारे कागदपत्रे जमा केली आहेत. हा इश्यू पूर्णपणे ऑफर-फॉर-सेल असणार आहे ज्यामध्ये कंपनीचे प्रवर्तक आपले इक्विटी शेअर्स विकणार आहेत.
सुला विनयार्ड्स सुमारे 1200 ते 1400 कोटी रुपयांचा IPO बाजारात आणू शकते अशी शक्यता आहे. नाशिकमधील वाईन निर्माते सुला विनयार्ड्सने आयआयएफएल, कोटक महिंद्रा कॅपिटल आणि सीएलएसए यांना त्यांच्या प्रस्तावित आयपीओसाठी बँकर म्हणून नियुक्त केले आहे. लवकरच कंपनी सेबीकडे आयपीओ अर्ज दाखल करू शकते. पण त्याचवेळी सुला वाईनयार्ड्सने याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नाही.या आयपीओमध्ये शेअर्सच्या फ्रेश इश्यूसह ऑफर फॉर सेल असेल, ज्या अंतर्गत कंपनीचे सर्व गुंतवणूकदार त्यांचे शेअर्स विकू शकतील.
सुला वाईनयार्ड्सने सन 1999 मध्ये पहिली वायनरी स्थापन केली. कंपनीचे सध्या 13 पेक्षा जास्त ब्रँड आहेत. कंपनी 14 राज्यांमध्ये पसरलेल्या मोठ्या डिस्ट्रीब्यूशन नेटवर्कद्वारे त्यांची विक्री करते. कंपनीकडे 2000 एकरपेक्षा जास्त वाईन यार्ड्स आहेत. यातील बहुतांश द्राक्षबागा कंत्राटावर घेण्यात आल्या आहेत. या द्राक्षबागा महाराष्ट्रातील नाशिक, दक्षिण महाराष्ट्र आणि कर्नाटकच्या काही भागात आहेत. आर्थिक वर्ष 2022 मध्ये सुला वाईनयार्ड्सचा देशांतर्गत बाजारपेठेत 52 टक्के हिस्सा होता.
अधिकृत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या कंपनीने आधीच बऱ्यापैकी नफा कमावला आहे. परंतू यासाठी कंपनीने खास श्रेणी तयार केली आहे. गेल्या तिमाहीत कंपनीच्या विक्रीतही बऱ्यापैकी वाढ झाली आहे. या कंपनीचा महसूल लक्झरी टुरिझम वर्टिकलमधूनही येतो. नाशिकमध्येच यांचे रिसॉर्टही आहे. सुलाचे मुख्यालय मुंबईपासून 180 किलोमीटर दूर नाशिकमध्ये असून त्यांचे उत्पादनाचे दोन युनिट्स आहेत. एक प्लँट नाशिक तर दुसरा बंगळुरुमध्ये आहे. देशांतर्गत बाजार आणि वाईन इंडस्ट्रीमध्ये कंपनीची स्थिती मजबूत असून त्यांचे नेटवर्कही स्ट्राँग आहे. सुला वायनरीचे एकूण 13 ब्रँड असून 56 देशांतर्गत त्यांना लेबल मिळाले आहेत.
नाशिकच्या या कंपन्या रांगेत
नाशिकमधील काही कंपन्यांचेही आयपीओ लवकरच येणार आहेत. त्यात सह्याद्री फार्म्स, पार्कसाईड होम्स, डेअरी पॉवर या कंपन्यांचा समावेश आहे.
Nashik Sula Vineyards IPO Coming Soon