विशेष प्रतिनिधी, नाशिक
जिल्ह्यात लागू करण्यात आलेल्या अंशत: लॉकडाऊनमुळे काही प्रमाणात कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होण्यास मदत होत आहे. परंतू गेल्या तीन चार दिवसांपासून बाधितांची संख्या एका विशिष्ट मर्यादेला स्थिर झाली आहे. ही बांधितांची संख्या पुर्णत: कमी करण्यासाठी कठोर निर्णय घेवून 12 मे 2021 रोजी दुपारी 12:00 पासून 23 मे 2021 पर्यंत जिल्ह्यात कडक लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. या कडक लॉकडाऊनच्या काळात जनतेच्या पूर्ण सहकार्याने कोरोना विरूद्धची जिंकण्याचा विश्वास राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी व्यक्त केला आहे. कडक लॉकडाऊनसंबंधीचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी काढले आहेत. ते पुढीलप्रमाणे,