चांदवड (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – मनमाड येथून सप्तशृंगी गडावर जाणाऱ्या मनमाड- नांदूरीगड या बसला चांदवड – देवळा रस्त्यावर असरखेडा शिवारातील मतेवाडी जवळ अपघात झाला. या अपघाता बस वाहक सारिका लहिरे यांचा मृत्यू झाला आहे.
समोरुन येणा-या वाहनाने बसला हुलकावणी दिल्याने बसचा स्टेरिंग रॉड तुटल्याने बस अनियंत्रीत होऊन ती झाडावर जाऊन आदळली यात बसचा एक भाग पूर्णपणे कापला गेला. यात वाहकाच्या बाजूकडील पाच प्रवासी गंभीर जखमी झाले. यातील एक महिला प्रवाशाचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे. अपघाताची माहिती मिळताच जखमींना तातडीने चांदवडच्या शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.या बस मध्ये एकुण १३ प्रवाशी प्रवास करीत होते.
ही एसटी बस मनमाडहून नांदुरीकडे जात होती. समोरुन येणाऱ्या वाहनाने एसटी बसला कट मारला. त्यामुळे एसटीचा रॉड तुटला. परिणामी, चालकाचे बसवरील नियंत्रण सुटले आणि एसटी बस थेट समोरील झाडावर आदळली. हा अपघात एवढा भीषण होता की, बसच्या एका बाजूचा चक्काचूर झाला. जखमी प्रवाशांना तातडीने चांदवडच्या उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. यातील काही जखमींची प्रकृती गंभीर आहे.
Nashik ST Bus Accident Conductor Passenger Death