नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – शासनाच्या क्रीडा विभागांतर्गत जिल्ह्यामध्ये विविध खेळांच्या प्राथमिक कौशल्य विकासासाठी उन्हाळी प्रशिक्षण शिबीराचे आयोजन करण्यात आले असून 19 एप्रिल 2022 रोजी व्हॉलीबॉल, हॉकी, तलवारबाजी या खेळांचे उद्घाटन छत्रपती शिवाजी महाराज स्टेडीयम येथे करण्यात आले आहे. या उन्हाळी प्रशिक्षण शिबीरात इच्छुकांनी सहभाग घ्यावा, असे अवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी राजेश बागुल यांनी शासकीय प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे.
शासकीय प्रसिद्धी पत्रकात नमुद केल्यानुसार, जिल्हास्तरावर क्रीडा विभागांतर्गत क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य पुणे, जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने मैदानी, हॉकी, तलवारबाजी व व्हॉलीबॉल अशा विविध खेळांच्या प्राथमिक कौशल्य विकासासाठी हे उन्हाळी प्रशिक्षण शिबीर घेण्यात येत आहे.
असे आहे उन्हाळी प्रशिक्षण शिबीराचे आयोजन
क्र.– खेळाचा प्रकार– दिनांक– वेळ– स्थळ– प्रशिक्षकाचे नाव
1 व्हॉलीबॉल
प्रथम शिबीर- 15 ते 30 एप्रिल 2022
द्वितीय शिबीर- 02 मे ते 30 मे 2022
प्रथम शिबीर-सकाळी 07.30 ते 09.00 तसेच
द्वितीय शिबीर-सायंकाळी 05.00 ते 07.00
छत्रपती शिवाजी महाराज स्टेडीयम, हुतात्मा स्मारकाच्या मागे, नाशिक
व्हॉलीबॉल क्रीडा मार्गदर्शक श्री. राजेंद्र शिंदे 7387795777, सहा. क्रीडा मार्गदर्शक श्री. दिनेश जाधव 9822777243
2 मैदानी खेळ
02 ते 11 मे 2022 सकाळी 6 ते 8 व सायंकाळी 5 ते 7 पर्यंत
विभागीय क्रीडा संकुल, पंचवटी नाशिक
मैदानी क्रीडा मार्गदर्शक श्री. सुरेश काकड 8888806158 सहा, क्रीडा मार्गदर्शक श्री. सिद्धर्थ वाघ 9657876195
3 हॉकी
प्रथम शिबीर- 16 ते 30 एप्रिल 2022
द्वितीय शिबीर- 11 ते 20 मे 2022 प्रथम शिबीर-सकाळी 07.30 ते 09.00 तसेच द्वितीय शिबीर-सकाळी 07.00 ते 09.00
तसेच 1) सायंकाळी 4.30 ते 07.00 2) सकाळी 08.ते 10 वाजेपर्यंत
छत्रपती शिवाजी महाराज स्टेडीयम, हुतात्मा स्मारकाच्या मागे, नाशिक
तसेच
1) के.एन.केला हायस्कुल,नाशिकरोड, नाशिक
2) म. वि. प्र. समाज होरीझॅन ॲकेडमी, निफाड हॉकी क्रीडा मार्गदर्शक श्रीमती सी,एस.उदार 9403735492
सचिव हॉकी श्री. अजीज सय्यद 9021929786 हॉकी प्रशिक्षक श्री. रोहीत भुसारे 8668367901
4 तलवारबाजी
16 ते 30 एप्रिल 2022 सकाळी 07.00 ते 09.00 सायंकाळी 05 ते 07 वाजेपर्यंत
छत्रपती शिवाजी महाराज स्टेडीयम, हुतात्मा स्मारकाच्या मागे, नाशिक
आंतरराष्ट्रीय पदक प्राप्त खेळाडू व क्रीडा मार्गदर्शक श्री. अजिंक्य दुधारे 9860970001 शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार्थी श्री. राजू शिंदे
8007230774