नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- नाशिक जिल्हा तलवारीबाजी संघटनेच्या वतीने सब ज्युनिअर गटांच्या जिल्हास्तरीय तलवारबाजी स्पर्धा आणि निवड चाचणीचे आयोजन कालिका मंदिर ट्रस्ट हॉल येथे करण्यात आले आहे. दोन दिवसीय या स्पर्धेचे उद्घाटन काल दिनांक १ऑगस्ट रोजी महात्मा गांधी विद्यामंदिर संस्थेचे सटाणा येथील भाऊसाहेब हिरे महाविद्यालयाचे क्रीडा संचालक दिनेश कराड यांचे हस्ते आणि जिल्हा तलवारबाजी संघटनेचे सचिव राजू शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडले.
या स्पर्धेत संपूर्ण जिल्ह्यातून १७५ खेळाडूंनी सहभाग नोंदविला. या स्पर्धा साखळी आणि नंतर बाद पद्धतीने खेळविल्या जात आहेत.
या स्पर्धेत सहभागी झालेल्या खेळाडूमध्ये राज्य स्पर्धेत पदक प्राप्त केलेल्या विरल म्हस्के , अनन्या सुळे अश्या खेळाडूंचा समावेश आहे. विरल आणि अनन्या यांनी मागील वर्षी राज्य स्पर्धेत याच गटामध्ये रौप्य पदक मिळविले होते. या स्पर्धेतही विरल म्हस्के याने ईपी या प्रकारात तीन सामने जिंकून आपल्या गटामध्ये पाहिले स्थान मिळविले आहे. तर फॉइल प्रकारात खेळताना अनन्या सुळे हीनेही सुंदर खेळ करत आपल्या गटात आघाडी घेतली आहे.
या स्पर्धेतील कामगिरीच्या आधारे खेळाडूंची जिल्हा संघामध्ये निवड करण्यात येणार आहे.
हे निवड झालेले खेळाडू हिंगोली येथे आठ ते दहा ऑगस्ट, २०२५ दरम्यान आयोजीत महाराष्ट्र राज्य स्पर्धेत नशिक जिल्ह्याचे प्रतिनिधीत्व करतील.
नाशिकच्या खेळाडूंची चांगली तयारी असून यावेळी त्यांच्याकडून सुवर्ण पदकांची आपेक्षा आहे असा विश्वास राजू शिंदे यांनी व्यक्त केला आहे.
स्पर्धा यशस्वी करण्यासाठी जय शर्मा राहुल फडोळ, आशिष परदेशी, हर्षदा नाईक यांनी परिश्रम घेत आहेत.