नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)– नाशिक जिल्हा जंपरोप असोसिएशन वतीने आयोजित जिल्हा जम्परोप स्पर्धा कालिका मंदिर सभागृह येथे उत्साहात संपन्न झाल्या. या स्पर्धेत जिल्ह्यातील विविध शाळांनी सहभाग नोंदवला त्यामध्ये सेंट फ्रान्सिस हायस्कूल तिडके कॉलनी, निर्मला कॉमेंट, फ्रवासी अकॅडमी, फ्रवासी इंटरनॅशनल, विद्या प्रबोधिनी, आदर्श इंग्लिश मीडियम स्कूल, दिल्ली पब्लिक स्कूल, एस्पेलियर स्कूल, आत्मा मलिक स्कूल, एमी. एस. गोसावी कॉलेज, कॉस्मिक ट्री स्कूल आदींनी सहभाग नोंदवला.
विजयी खेळाडूंना कालिका मंदिरचे अध्यक्ष केशव (अण्णा) पाटील, शिवछत्रपती पुरस्कार विजेते अशोक दुधारे, आनंद खरे, राजू शिंदे, दीपक निकम आदींनी शुभेच्छा दिल्या. त्यांच्या हस्ते विजयी खेळाडूंना पारितोषिके देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी विक्रम दुधारे, अमोल आहेर, मयूर गुरव, वैशाली मत्सागर, तन्मय कर्णिक, निमेश शेटे आदींची उपस्थिती होती. यावेळी बोलतांना केशव अण्णा पाटील यांनी नाशिक जिल्हा संघामध्ये निवड झालेल्या खेळाडूंचे अभिनंदन केले आणि नाशिकमध्येच होणाऱ्या राज्य स्पर्धेसाठी शुभेछया दिल्या.
उद्या फेडरेशन चषक स्पर्धा – नाशिकच्या विभागीय क्रीडा संकुल येथे ८ वी फेडरेशन चषक राज्य स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये नाशिकचे खेळाडू चांगला खेळ करून पदके मिळवीत असा विश्वास विक्रम दुधारे आणि दीपक निकम आणि व्यक्त केला.
स्पर्धेचा निकाल खालील प्रमाणे –
१८ वर्षे मुली – १) ३० सेकंड स्पीड – ग्रीशा पीचा – सुवर्ण , स्वरा जाधव – सिल्वर, अक्षरा पवार – ब्राँझ.
२) डबल अंडर – लब्दही कोठारी-गोल्ड, ईश्वरी पाचोरकर-सिल्वर, पंकजा वसावे-ब्राँझ.
३) ३ मिनिट एंडूरन्स – आस्था कोठारी-गोल्ड, स्वरा भगत-सिल्वर, आराद्या वसावे-ब्राँझ.
४) फ्रीस्टाइल – सृष्टी सोमानी-गोल्ड, अन्विता सूर्यवंशी-सिल्वर, आराध्या काळे-ब्राँझ.
१८ वर्षे मुले – १) ३० सेक स्पीड – साई मराठे-गोल्ड,अमोल मेध -सिल्वर, आदर्श दहीजे- ब्राँझ.
२) डबल अंडर – श्रीराज रोड-गोल्ड, सर्वज्ञ सोळंके-सिल्वर, श्लोक वाटपाडे-ब्राँझ.
३) ३ मिनिट एंडूरन्स – देवांश कुमट-गोल्ड, नक्ष बराहते-सिल्वर, मयंक मगरे-ब्राँझ.
४) फ्रीस्टाइल – जिनिंग शाह-गोल्ड, प्राध्युम्न जेउघाले-सिल्वर, हिमांशू शिंदे-ब्राँझ.
खुला गट मुले – १) ३० सेक स्पीड – अद्वैत खैरनार-गोल्ड, नितीन मनभाव – सिल्वर, तनुष शिंदे – ब्राँझ.
२) डबल अंडर – चैतन्य माळी – गोल्ड, ओजस झाडे – सिल्वर, सूरज निफाडे- ब्राँझ,एमव्हीपी सनराइज
३) ३ मिनिट एंडूरन्स – समर्थ घाटोळे-गोल्ड, श्रुत पाटणी – सिल्वर, समीर भोये-ब्राँझ.
४) फ्रीस्टाइल – गौरव पवार-गोल्ड, स्वारीत पाचोरकर-सिल्वर, समर्थ सूर्यवंशी-ब्राँझ.
खुला गट मुली – १) ३० सेक स्पीड – दरिया साखला- गोल्ड, दिशा गावित-सिल्वर, त्रिशा कुमट- ब्राँझ.
२) डबल अंडर – समृद्धू राठोड-गोल्ड, मिश्का चोपडा-सिल्वर, ईश्वरी देवरे-ब्राँझ.
३) ३ मिनिट एंडूरन्स – रेणुका जमदाडे-गोल्ड, प्रेरणा चौधरी-सिल्वर, शरयू साळुंखे-ब्रोंज.
४) फ्रीस्टाइल – राजुल लुंकड- गोल्ड, आरोही गचाले-सिल्वर, सिद्धी भावसार-ब्राँझ.