इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
नाशिक डिस्टिक मल्लखांब असोसिएशन नाशिक आणि यशवंत व्यायाम शाळा, नासिक यांच्या संयुक्त विद्यमाने साने गुरुजी आरोग्य मंदिर यांच्या कल्पनेतून नवोदित खेळाडूंसाठी पहिली कै.भाऊसाहेब रानडे मानचिन्ह स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धा नाशिक विभागासाठी असणार आहेत यामध्ये नाशिक, धुळे, जळगांव नंदुरबार या चार जिल्ह्यांचे खेळाडू सहभागी होणार आहेत. ही नवोदित मल्लखांब स्पर्धा रविवार दिनांक २२ डिसेंबर,२०२४ रोजी यशवंत व्यायाम शाळा, महात्मा गांधी रोड, नाशिक येथे आयोजित करण्यात येणार आहे.
या स्पर्धेचे उद्घाटन दिनांक २२ डिसेंबर, २-२४ रोजी सकाळी ८.०० वाजता होईल. उदघाटनंतर दिवसभर स्पर्धा खेळविल्या जाणार आहेत. तर स्पर्धेचा समारोप त्याच दिवशी संध्याकाळी ०६.३० वाजता संपन्न होईल. महाराष्ट्र हौशी मल्लखांब संघटनेच्या मान्यतेने आणि प्रचलित नियमानुसार हि स्पर्धा खेळविण्यात येणार आहे. या स्पर्धेसाठी स्पर्धाप्रमुख रवी गायकवाड तर स्पर्धा संचालक म्हणून यशवंत जाधव असतील. त्याचप्रमाणे दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी त्याच दिवशी विशेष मल्लखांब स्पर्धा आयोजित करण्यात आलेली आहे. या स्पर्धेसाठी कोणत्याही जिल्ह्यातील खेळाडू सहभाग घेऊ शकतात.
या स्पर्धेमध्ये मुलींसाठी १० वर्षे, १२ वर्षे, १४ वर्षे आतील गट आणि १६ वर्षे वरील गट असे वयोगट असणार आहेत. तर मुलांसाठी १० वर्षे, १२ वर्षे, १४ वर्षे ,१६ वर्षे आतील गट आणि १६ वर्षे वरील गट असे वयोगट असणार आहेत. प्रत्येक संघात ४ (चार ) खेळाडू असतील. संघात ४ पेक्षा अधिक खेळाडू असल्यास त्या संस्थेने “ब” संघम्हणून प्रवेश घ्यावा. प्रत्येक वयोगटात संस्था अ आणि ब संघ स्पर्धेसाठी सहभागी करू शकतात. दिव्यांग खेळाडूंसाठी ही स्पर्धा खुल्या वयोगटात घेण्यात येईल.
आपल्या संस्थेतील सहभागी होणाऱ्या खेळाडूंची गटवार नावे, जन्म तारखेसह आमच्या. https.//www.mallakham,,bcompetition.com या सांकेतिक स्थळावर १७ डिसेंबर,२०२४ पर्यंत नोंदवावी. उशिरा प्रवेशिका नोंदविण्यासाठी आयोजकांकडून १००/- रुपये अतिरिक्त नोंदणी शुल्क आकारण्यात येईल. अधिक माहितीसाठी यशवंत जाधव, मो. क्र. – ९८९०९९९८९४ आणि राजेश अमराळे, मो. क्र. ९८६७७७७१९३ यांना संपर्क करावा. तरी या स्पर्धेत नाशिक विभागातील चार जिल्ह्यांच्या जास्तीत जास्त मल्लखांब पट्टूनी सहभागी व्हावे असे आवहान नाशिक जिल्हा मल्लखांब असोसिएशनचे अध्यक्ष तथा यशवंत व्यायाम शाळेचे अध्यक्ष दीपक पाटील यांनी केले आहे.