नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – महाराष्ट्र ऍथलेटिकस असोसिएशनच्या परवानगीने आणि मार्गदर्शनाखाली नाशिक जिल्हा ऍथलेटिक्स असोसिएशनच्या वतीने नाशिकमध्ये दिनांक ४ ते ६ ऑक्टोबर, २०२३ दरम्यान ३७ व्या ज्युनियर आणि युथ गटांच्या महाराष्ट्र राज्य ऍथलेटिक्स स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
यामध्ये १८ वर्षे मुले आणि मुली आणि २० वर्षे मुले आणि मुली या दोन वयोगटांचा समावेश आहे. नाशिकच्या मीनाताई ठाकरे विभागीय क्रीडा संकुलाच्या सिथेटिक ट्रॅक वर या स्पर्धा आयोजित केल्या जाणार आहेत. या स्पर्धेत महाराष्ट्राच्या विविध जिल्ह्यांचे १८०० खेळाडू सहभागी होणार आहेत. स्पर्धेतील कामगिरीच्या आधारे खेळाडूंची निवड महाराष्ट्राच्या संघासाठी करण्यात येणार आहे.
हे निवड झालेले खेळाडू दिनांक ७ ते १- नोव्हेंबर दरम्यान कोईमतूर येथे आयोजित राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धेत महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करतील. तरी नाशिक कर क्रीडाप्रेमी नागरिकांनी या स्पर्धेला उपस्थित राहून खेळाडूंना प्रोत्साहित करावे असे अवाहन नाशिक जिल्हा ऍथलेटिकस असोसिएशनचे अध्यक्ष हेमंत पांडे, सचिव सुनील तावरगिरी सर्व प्रशिक्षक यांनीं केले आहे.
nashik Sport news