नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – स्पोर्ट्स क्राफ्ट द्वारे नाशिक मध्ये दुचाकी व चारचाकी आयोजित करण्यात आली आहे. ही स्पर्धा TSD (वेळ वेग अंतर) मध्ये होणार असून सुमारे ७५ किलोमीटरची नेव्हिगेशन रॅली आहे.या स्पर्धेमध्ये एकूण पन्नास स्पर्धकांनी सहभाग नोंदवला असून ३२ चारचाकी तर १८ दुचाकी गाड्यांचा समावेश आहे . काल सर्व स्पर्धेतील वाहनांची तपासणी रवींद्र वाघचौरे यांनी केली . सर्व स्पर्धकांना स्पर्धेविषयी नियम व माहिती स्पर्धा अधिकारी समीर बुरकुले यांनी दिली. या स्पर्धेची सुरवात ९ मार्च २०२५ रोजी सकाळी नऊ वाजता एसएसके वर्ल्ड क्लब, पाथर्डी, नाशिक,येथून सुरुवात होणार असून उदघाटन जिल्हाधिकारी जलज शर्मा यांच्या हस्ते होणार असून पारितोषिक वितरण समारंभ मनपा आयुक्त मनीषा खत्री यांच्या हस्ते होणार आहे . या प्रसंगी एसएसके वर्ल्ड क्लबचे संचालक शैलेश कुटे, आर टी ओ अधिकारी अब्बास देसाई, सचिन बोधले हे उपस्थित राहणार आहे .
स्पोर्ट्स क्राफ्ट ही संस्था एफएमएससीआय (भारतीयमोटरस्पोर्ट्सक्लब फेडरेशन) शी संलग्न असून आरटीओ नाशिकच्या सहकार्याने सुरक्षित ड्रायव्हिंग आणि रस्ता सुरक्षेला चालना देण्यासाठी हि स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.या साठी फेडरेशन कडून रवी शामदासानी व गणेश लोखंडे हे लक्ष ठेऊन असणार आहे . सदर स्पर्धा नाशिक आर टी ओ व स्पोर्ट्स क्राफ्ट यांच्या संयुक्त विद्यमाने घेण्यात येणार आहे .
ग्रामीण भागात या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे .या स्पर्धेसाठी ग्रामीण पोलिसांचे विशेष सहकार्य लाभले आहे . हि स्पर्धा दुचाकी व चारचाकी अश्या दोन गटात होणार आहे . विजेत्यांना रोख बक्षिसे , चांदीची नाणी प्रमाणपत्रे आणि ट्रॉफी देण्यात येतील. तसेच काही विशेष बक्षिसे ठेवण्यात आले आहेत . 1. सर्वोत्कृष्ट ज्येष्ठ संघ 2. सर्वोत्कृष्ट तरुण संघ 3. सर्वोत्कृष्ट पती आणि पत्नी संघ 4. सर्वोत्कृष्ट महिला संघ 5. सर्वोत्कृष्ट वडील / आई मुलगी/मुलगा संघ अशा विविध गटात स्पर्धा होणार आहे .