नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – मुंबई येथील प्रियदर्शनी पार्क येथे मध्ये नुकत्याच पार पडलेल्या आय.सी.एस.सी. इंटर स्कूल राज्यस्तरीय स्पर्धेत १४ वर्षे, १७ वर्षे आणि १९ वर्षे या तीनही वयोगटात अशोका युनिव्हर्सल स्कूल, चांनशीच्या खेळाडूंनी सहभागी होत घवघवीत यश मिळवले. सदर स्पर्धेत अशोका यूनिवर्सल स्कूलच्या खेळाडूंचा मोठा दबदबा बघायला मिळाला. यामध्ये दहा सुवर्ण आणि चार रजत पदकांचा समावेश आहे.
उल्लेखनीय बाब म्हणजे ओवी निकम हिने तिहेरी उडी मध्ये सुवर्णपदक जिंकले. या प्रकारात ओवीने ११ मीटर.२४ सेंटीमीटर उडी घेत नवीन विक्रम आपल्या नावावर केला. तसेच तिने लांब उडी क्रीडा प्रकारात सुवर्णपदक, १०० मिटर अडथळा शर्यत क्रीडा प्रकारात रौप्य पदक पटकावत इतिहास रचला. ओवी निकम या खेळाडूने सदर स्पर्धेत दोन सुवर्णपदकासह एक रौप्य पदक आपल्या नावे केले आहे. याच वयोगटात कु. गौतमी पुस्तके हिने १५०० मीटर आणि ३००० मीटर धावणे या क्रीडा प्रकारात सुवर्णपदक आपल्या नावे करत १५०० आणि ३००० मीटर धावणे या स्पर्धेत राज्यस्तरावर नवीन विक्रम आपल्या नावे केला.
३००० मीटर चालणे या प्रकारात कु. सिद्धी बिरानिया हिने सुवर्णपदक पटकावले. १४ वर्षाखालील मुलींमध्ये देवांशी काळे हिने ४०० मीटर धावण्यामध्ये सुवर्णपदक मिळवले
मुलांच्या गटात १७ वर्षाखालील गटात ऐश्वर्य वाळुंज याने ५ कि.मी. चालणे या क्रीडा प्रकारात सुवर्ण आणि ३००० मीटर धावणे या प्रकारात रौप्य पदक पटकावले. याच गटात अर्चित मानकर याने ३ किलोमीटर धावणे मध्ये सुवर्णपदक आणि १५०० मीटर धावणे आणि ८०० मीटर धावणे या दोनही प्रकारात सुवर्णपदक पटकावत राज्यस्तरावर नवीन विक्रम आपल्या नावे केला. १९ वर्षाखालील मुलींमध्ये दिशा देवगिरे हिने ४०० मीटर अडथळा रेस मध्ये सुवर्णपदक, १०० मीटर अडथळा शर्यत मध्ये रौप्य पदक, ८००मीटर धावणे या प्रकारात रौप्य पदक पटकावत उल्लेखनीय कामगिरी केली.
या स्पर्धेतील उत्कृष्ट कामगिरीसाठी अशोका युनिव्हर्सल स्कूलचे खेळाडू आणि प्रशिक्षक यांचा विशेष गौरव करण्यात आला. विजेत्या सर्व खेळाडूंची दिनांक २४ ते २८ सप्टेंबर,२०२४ दरम्यान हैदराबाद येथे होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. या सर्व खेळाडूंना अशोका स्कूलचे ॲथलेटिक्स प्रशिक्षक बालाजी शिरफुले यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. अशोका स्कूलच्या प्राचार्य डॉ. प्रिया डिसूजा, प्राचार्य प्रमोद त्रिपाठी, क्रीडा विभाग प्रमुख भूपेश देशमुख यांनी विजेत्या खेळाडूंचे अभिनंदन केले आणि पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.