नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – कुसुमाग्रज प्रतिष्ठानच्या वतीने निसर्गकवी ना. धों. महानोर यांच्या स्मृती निमित्त सोमवार १४ ऑगस्ट रोजी कुसुमाग्रज स्मारकात सायं. ६.३० वाजता पक्ष्यांचे लक्ष थवे गगनाला पंख नवे… या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमात महानोर यांच्या कवितांचे आणि पत्रांचे वाचन होणार आहे.
या कार्यक्रमासाठी प्रतिष्ठानचे माजी अध्यक्ष, सिने, नाट्य दिग्दर्शक डॉ. जब्बार पटेल प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार असून कार्यक्रमात ना. धों. महानोर यांच्या निवडक कवितांचे वाचन प्रकाश होळकर, शंकर बोऱ्हाडे, संजय चौधरी, गंगाधर अहिरे, लक्ष्मण महाडिक, रवींद्र मालुंजकर व विष्णू थोरे हे कवी करणार आहेत. तर, अॅड. विलास लोणारी, अपर्णा क्षेमकल्याणी, अपर्णा वेलणकर, सी. एल. कुलकर्णी हे महानोरांच्या पत्रांचे वाचन करणार असून आनंद अत्रे आणि प्रांजली बिरारी गीतगायन करणार आहे. कार्यक्रमासाठी श्रोत्यांनी अवश्य उपस्थित राहावे असे आवाहन कुसुमाग्रज प्रतिष्ठानच्या वतीने करण्यात आले आहे.
Special program on Monday in memory of Mahanor