नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – सोशल मीडियावर जातीवाचक व्देषातून महापुरुषांबाबत आक्षेपार्ह पोस्ट प्रसारित केल्याप्रकरणी उपनगर पोलिसांनी सात जणांविरुद्ध अनुसुचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंध अधिनियमासह विविध कलमांन्वये गुन्हा नोंदवला आहे. सौरभ जोशी, रूपेश खालकर (रा. खर्जुल चौक, सिन्नर फाटा, नवनाथ किराणा जवळ, नाशिकरोड), हर्ष किंग, पी शिवराज, विराज सोनवणे, साधु नवीनजी, शिवा जाधव यांच्याविरुद्ध ही गुन्हा नोंदवण्यात आलेल्याची नावे आहे.
याप्रकरणी आकाश दिलीप घुसळे (वय ३२ वर्ष, रा. भिमनगर, जेलरोड, नाशिकरोड) यांनी तक्रार दिली आहे. या तक्रारीत आरोपींनी एकविचाराने, संगनमताने तथागत गौतम बुध्द, महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर, राष्ट्रीय संत गाडगे महाराज व माता रमाबाई आंबेडकर यांच्याबाबत आक्षेपार्ह पोस्ट सोशल सोशल मीडियावर प्रसारीत करुन विटंबना केली. याप्रकरणी सहायक पोलिस आयुक्त अंबादास भुसारे तपास करत आहेत.
Nashik Social Media Post Police FIR