शुक्रवार, डिसेंबर 5, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

काय सांगता! नाशिककर एका बटणावर थांबवणार ट्रॅफिक; असे आहेत त्याचे फायदे

जून 14, 2022 | 5:15 am
in संमिश्र वार्ता
0
nashik traffic signal e1655137897598

नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – आपल्या देशातील गेल्या काही वर्षात वाहनांची प्रचंड संख्या वाढली आहे. महाराष्ट्राचा विचार केल्यास वाहन संख्येत आपल्या राज्याचा देशात खूप वरचा क्रमांक लागतो, त्यातच मुंबई, पुणे, नाशिक, नागपूर आणि औरंगाबाद या सारख्या मोठ्या शहरांमध्ये तर भरधाव वेगाने वाहने जात असतात. तसेच कोणत्याही रस्त्यावर वाहनांची सिग्नल दरम्यान मोठी गर्दी दिसून येते. परंतु सिग्नल पडण्यापूर्वी वाहने धावू लागतात. त्यामुळे पादचाऱ्यांना रस्ता ओलांडणे कठीण होऊन बसते. विशेषतः लहान मुले, महिला, ज्येष्ठ नागरिक आणि अपंग व्यक्ती यांना रस्ता ओलांडतांना मोठी कसरत करावी लागते. इतकेच नव्हे तर जीव मुठीत घेऊन रस्ता पार करावा लागतो. मात्र आता त्यावर नाशिक शहरात एक आगळा वेगळा पर्याय शोधून काढण्यात आला आहे, पादचाऱ्यांना रस्ता ओलांडतांना सिंगल स्वतः थांबविता येणार आहे, त्यामुळे सर्वांची सोय होऊन वाहने देखील शिस्तीत जाऊ शकतील, असे सांगण्यात येत आहे.

शहरात सिग्नलवर भरधाव वेगाने धावणारी वाहने दिसतात, इतकेच नव्हे तर एक सिग्नल थांबत नाही तोच दुसरा पडतो. त्यामुळे सर्वसामान्य पादचाऱ्याला रस्ताच ओलांडता येत नाही. मात्र आता त्यावर नवीन स्मार्ट पर्याय नाशिक स्मार्ट सिटीने शोधला आहे. पादचाऱ्यांना रस्ता ओलांडण्यासाठी पेलिकन सिग्नल बसवण्यात येणार आहेत. परंतु हा प्रयोग सर्वप्रथम त्र्यंबक नाका ते अशोकस्तंभ दरम्यान साकारलेल्या स्मार्टरोडवर हे पेलिकन सिग्नल्स बसविण्यात येणार आहेत.

वास्तविक पाहता रस्त्यांवर चालणे हे पादचाऱ्यांचा पहिला हक्क मानला जातो. त्यामुळे पादचाऱ्यांचा हा हक्क अबाधित ठेवण्यासाठी परदेशात विविध संकल्पना राबविल्या जातात. तसेच नवीन रस्ता तयार करताना त्याशेजारी पदपथ असलेच पाहिजेत आणि त्याची लांबी रुंदीही पुरेशी असली पाहिजे यासाठी आता रोड डिझायनिंग संकल्पनाही राबविली जात आहे.

सिग्नलवर वाहनतळावर होणारी अडचण लक्षात घेऊन राबविण्यात येणारी संकल्पना प्रथमच राबविण्यात येणार आहे. मात्र स्मार्ट सिटीची संकल्पना चांगली असली तरी नाशिकमध्ये ती कशी यशस्वी ठरेल याबाबत मात्र संबंधित प्रशासनामध्ये मतभेद आहेत. नाशिकमध्ये सिग्नल असूनही त्याचा उपयोग हाेत नाही. सिग्नलचे दिवे न बघताच वाहने पळवली जातात अशावेळी पादचाऱ्याने बटन दाबून सिग्नल थांबविण्याचा प्रयत्न केला तरी तो कसा उपयुक्त ठरेल याविषयी शंका व्यक्त केली जात आहे.

खरे म्हणजे अनेक सिग्नलवर पादचाऱ्यांसाठी पांढऱ्या काळ्या पट्टया अर्थात झेब्रा क्रॉसिंग करून सोय केलेली असते. मात्र, तरीही वाहने त्यावर उभी राहत असल्याने रस्ता ओलांडणे कठीण होते. चहूबाजूंचे सिग्नल सुरू झाल्यानंतर पादचाऱ्यांना चालणे कठीण होते. त्यावर आता पेलिकन सिग्नलची सोय शोधण्यात आली आहे. सिग्नलवरील बटणचा वापर करून सिग्नल थांबवून पादचाऱ्यांना रस्ता ओलांडता येईल असे सांगण्यात येत आहे.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

वर्षभरात २ रुपयांचा हा शेअर थेट १७०० रुपयांवर; १ लाखांचे झाले ८ कोटींहून अधिक

Next Post

ज्येष्ठ नागरिकांनो, एसटीने प्रवास करणार आहात? मग हे वाचाच

टीम इंडिया दर्पण

ग्रामीण ते शहरी आणि जुन्या ते नव्या अशा सर्वच पातळीवर आम्ही विकास पत्रकारितेला अधिक महत्त्व देतो. समाजोन्नती व्हावी, लोकशाही बळकट व्हावी, अन्यायाला वाचा फोडावी आणि विधायक कार्य घडावे यासाठी आम्ही आग्रही आहोत.

Related Posts

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

असा असेल तुमचा शुक्रवारचा दिवस… जाणून घ्या, १४ नोव्हेंबरचे राशिभविष्य…

नोव्हेंबर 13, 2025
Vishwadharmi Manavta Teertha Rameshwar Rui
महत्त्वाच्या बातम्या

उध्वस्त मंदिर व मशिदीच्या जागी ‘विश्वधर्मी मानवतातीर्थ भवन’… उद्या होणार लोकार्पण… अशी आहेत त्याची वैशिष्ट्ये…

नोव्हेंबर 13, 2025
traffic signal1
महत्त्वाच्या बातम्या

अहिल्यानगर – मनमाड मार्गावरील वाहतुकीबाबत झाला हा महत्वाचा निर्णय…

नोव्हेंबर 13, 2025
IMG 20251113 WA0024
मुख्य बातमी

कुंभमेळ्यासाठी साडेपाच हजार कोटी रुपये खर्चाच्या विकासकामांचे भूमीपूजन…

नोव्हेंबर 13, 2025
IMG 20251113 WA0023
महत्त्वाच्या बातम्या

पंचवटीतील रामकाल पथचे मुख्यमंत्र्यांनी केले भूमीपूजन… रामकुंडाचा चेहरामोहरा बदलणार…

नोव्हेंबर 13, 2025
IMG 20251113 WA0021
महत्त्वाच्या बातम्या

नाशिक जिल्हा परिषदेच्या नूतन इमारतीचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण… अशी आहेत तिची वैशिष्ट्ये…

नोव्हेंबर 13, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

असा असेल तुमचा गुरुवारचा दिवस… जाणून घ्या, १३ नोव्हेंबरचे राशिभविष्य…

नोव्हेंबर 12, 2025
thandi
महत्त्वाच्या बातम्या

या शहरात तीव्र थंडीची लाट… असा आहे हवामानाचा अंदाज…

नोव्हेंबर 12, 2025
Next Post
city bus e1631185038344

ज्येष्ठ नागरिकांनो, एसटीने प्रवास करणार आहात? मग हे वाचाच

  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011