नाशिक स्मार्ट सिटीचा विध्वंसकारी कारभार
नाशिक स्मार्ट सिटी कंपनीच्या कारभारामुळे ऐतिहासिक नाशिकचे प्रचंड नुकसान होत आहे. ते आपण जाणून घेतले नाही तर येत्या काळात प्रचंड मोठी हानी होऊ शकते. नाशिककरांनी आता एकजूट दाखवायला हवी. म्हणूनच उद्या, शनिवार, १० डिसेंबर रोजी सकाळी ११:०० वाजता यशवंतराव महाराज पटांगण, गोदाघाट येथे जागृत नाशिककर या नात्याने उपस्थित रहावे….
गोदाघाट येथील निलकंठेश्वर महादेव मंदिर राज्य पुरातत्व विभागाच्या अंतर्गत संरक्षित वास्तू म्हणून नोंद आहे. सदरच्या ३०० मीटरचा परिघात संचालक, राज्य पुरातत्व विभाग यांचा पूर्व परवानगी शिवाय कोणतेही कामकाज होऊ शकत नाही हा कायदा आहे. असे असताना नाशिक म्युनिसिपल स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेडने जुलै २०२० मध्ये सांडव्यावरची देवीचा गोदापात्रातील ‘देवीचा सांडावा’ तोडला. त्यावेळी नवीन सांडावा बांधून देण्याचे आश्वासन देऊन सुद्धा सांडवा बांधून देण्यात आला नाही. त्याला आज पावणे तीन वर्षे झाली.
निलकंठेश्वर मंदिराबाहेर असणारा प्राचीन सांडवा विना परवानगी तोडला त्यात त्यापरिसरातील मंदिरांना भेगा पडल्या मंदिरे कमकुवत झाली. श्री गणपतीची मूर्ती तोडली. ७५० वर्ष पुरातन दगडी पायऱ्या नाहक तोडल्या त्यावेळी मी स्थानिकांसह विरोध केला त्यामुळे पुढील पायऱ्यांची तोडफोड थांबली. ह्या सर्व विध्वंसक बाबीं राज्य पुरातत्व विभागाच्या निदर्शनात आपण आणून दिल्या. पुरातत्व विभागाने नाशिक स्मार्ट सिटी कंपनीला पायऱ्या दुरस्त करण्यासाठी पत्र दिले. वरिष्ठ पोलीस निरीक्षक पंचवटी पोलीस ठाणे यांनी सुद्धा पत्र दिले. त्यासाठी स्मार्ट सिटी कार्यालयात बैठका पार पडल्या. मोका पाहणी झाली. त्याला आज १० महिने उलटून गेले तरी सुद्धा स्मार्ट सिटी कंपनी कुठलीही कारवाई करत नसून उलटपक्षी यशवंतराव महाराज पटांगण प्रतिबंधित क्षेत्रात फारश्या बसवीत आहे. ह्यामुळे आम्ही त्रस्त होऊन नाशिक स्मार्ट सिटी कंपनी विरोधात सत्याग्रह आंदोलन छेडले असून ह्या ‘वासरा स्थळ वाचवा’ मोहिमेत दि. १० डिसेंबर २०२२ शनिवार रोजी सकाळी ११:०० वाजता यशवंतराव महाराज पटांगण, गोदाघाट येथे जागृत नाशिककर यानात्याने उपस्थित राहून स्मार्ट सिटीला जाब विचारावा ही विनम्रपणे विनंती!
एकच ध्यास… मोकळा व्हावा श्री गोदावरीचा श्वास !!!!!!
गोदाघाट परिसराचे हेरिटेज अस्तित्व अबाधित राहिलेच पाहिजे !!!
गोदा घाटावरील वारसा स्थळांचे जतन आणि पुनर्जीवन ….
नाशिक म्युनिसिपल स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड समोर नाशिककरांच्या प्रमुख मागण्या …!!!!
१) स्मार्ट सिटी कंपनीने तोडलेला श्री गोदावरी नदी पात्रातील देवीचा सांडवा पूर्ववत् बांधून दयावा.
२) यशवंत महाराज पटांगण येथे तोडलेल्या पुरातन दगडी पायऱ्या पुरातन पद्धतीने बसवून दयाव्या .
३) स्मार्ट सिटी कंपनीने तोडलेली श्री गणपतीची मूर्ती विधिवत तयार करून पुन:स्थापित करावी.
४) सांडवा तोडताना छोट्या मंदिरांना भेगा पडलेल्या आहेत त्याची दुरस्ती करून दयावी.
४) गोपिकाबाई तास येथे पायऱ्यांवर कोरीव कासव आहे त्याचे संरक्षण-जतन करावे.
५) श्री गोदावरी नदी पात्रातील प्राचीन कुंडातील उर्वरित तळ सिमेंट काँक्रिट तात्काळ काढावे .
६) नदीतील काँक्रीट काढून प्राचीन सतरा कुंडाची निर्मिती करून गोदाघाटाला पुनर्वैभव प्राप्त करून दयावे .
७) गोदाघाट परिसरातील हेरिटेज अस्तित्व अबाधित ठेवून पुढील कामे करावी .
या मागण्यां पूर्ण करण्याची लेखी हमी नाशिक स्मार्ट सिटी कंपनीने दयावी.
– देवांग जानी (अध्यक्ष, गोदाप्रेमी सेवा समिती)
मो. 9850222100
Nashik Smart City Company Work Nashikkar Oppose