सिन्नर (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – समृद्धी महामार्गावर इनोव्हा कारच्या भीषण अपघातात चार जण ठार तर चार जण गंभीर जखमी झाले आहे. रविवारी मध्यरात्री हा अपघात झाला. इनोवा कार मधील प्रवासी नातेवाईकांना हज यात्रेसाठी मुंबई येथे सोडून शिर्डी कडे परतत असतांना ही घटना घडली.
या अपघातात रज्जाक अहमद शेख, (५५), सत्तार शेख लाल शेख, (६५), सुलताना सत्तार शेख, (५०) यांचा जागीच मृत्यू झाला. तर फैयाज दगुभाई शेख (४०) यांचा उपचार सुरु असताना मृत्यू झाला. जुबेर रज्जाक शेख, (३५), मैरूनिसा रज्जाक शेख (४५), अझर बालन शेख, (२५) मुस्कान अजर शेख (२२), हे गंभीर जखमी झाले असून सिन्नर येथे प्राथमिक उचारानंतर जखमींना तातडीने शिर्डी येथे पुढील उपचारांसाठी हलविण्यात आले.
रविवारी (दि. ११) मध्यरात्री बाराच्या सुमारास सिन्नर तालुक्यातील खापराळे शिवारात घोटी बाजूकडून शिर्डी बाजू कडे जाणारी इन्होवा कार (क्र चक-१९ ध- ६०७४) हिचे वरील चालकाचे नियंत्रण सुटले. त्यानंतर कार महामार्गाच्या मध्यभागी असलेल्या संरक्षण भिंतीवर जावून आदळल्याने हा अपघात झाला.
Nashik Sinner Samruddhi Highway Accident 4 Death