सिन्नर (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – सिन्नर तालुक्यातील चास गावातील तीन तरुण सोलापूर- तुळजापूर मार्गावरील तामलवाडी परिसरात झालेल्या अपघातात ठार झाले. तर तीन जण गंभीर जखमी आहे.
तुळजापूर येथे देवीच्या दर्शनासाठी ते बोलेरोतून गेले होते. पण, गाडीचे टायर अचानक फुटल्याने हा अपघात झाला. मंगळवारी सकाळी साडेदहा वाजता ही दुर्घटना घडली. सोमवारी रात्री साडे नऊ वाजता हे आठ तरुण देवदर्शनासाठी सिन्नर तालुक्यातील चास गावातुन गेलेले होते.
अपघातात मृत्यू झालेल्यांमध्ये निखिल रामदास सानप (२४), अनिकेत बाबासाहेब भाबड (२४), अर्थव शशीकांत खैरनार (२६) यांचा समावेश आहे. तर गंभीर जखमी झालेल्या भाविकांमध्ये तुषार दत्तात्रय बिडगर, दिपक बिडगर आहे. या अपघातात पंकज खैरनार, गणेश खैरनार, जीवन ढाकणे, शंकर भाबड हे किरकोळ जखमी झाले आहेत.
हे सर्व मित्र सिन्नर तालुक्यातील चास येथील रहिवासी आहेत. या अपघातानंतर जखमींना सोलापूर रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
Nashik Sinner Road Accident 3 Friends Death