सिन्नर (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – येथील औद्योगिक वसाहतीतील उद्योजकांचे विविध प्रश्न तातडीने मार्गी लागण्याच्या दृष्टीने निमाचे अध्यक्ष धनंजय बेळे यांनी उपसमित्यांची घोषणा करून वसाहतीतील उद्योजकांची निवड विविध उपसमित्यांमध्ये केली. सिन्नर औद्योगिक वसाहतीतील उद्योजकांचे विविध प्रश्न तातडीने सोडविण्यासाठी निमा हाऊस सिन्नर येथे उद्योजकांच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या प्रसंगी सिन्नर एमआयडीसीचे नुतन पोलिस निरीक्षक शाम निकम, निमाचे उपाध्यक्ष आशिष नहार, पायाभूत उपसमितीचे चेअरमन सुधीर बडगुजर, सिन्नर डेव्हलोपमेंट उपसमितीचे चेअरमन किरण वाजे, सिन्नर ऊर्जा उपसमितीचे चेअरमन प्रवीण वाबळे उपस्थित होते.
चर्चा करण्यासाठी त्यानुसार सिन्नर औद्योगिक वसाहतीतील उद्योजकांचे प्रश्न तातडीने मार्गी लावण्याचे आश्वासन निमाचे उपाध्यक्ष आशिष नहार यांनी निमा हाऊस सिन्नर येथे नुतन पोलिस निरीक्षक शाम निकम यांच्या उपस्थितीत आयोजित उद्योजकांच्या बैठकीत दिले. सिन्नर औद्योगिक वसाहतीतील उद्योजकांच्या विविध प्रश्नांबाबत निमा हाऊस सिन्नर येथे बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. सिन्नर शहराकडे आज औद्योगिक नगरी म्हणून पहिले जात आहे. सिन्नर मध्ये अनेक मल्टि नॅशनल उद्योगांबरोबरच लहान उद्योग आहेत. लहान उद्योगांमधील अनेक उद्योजक आपले स्वतःचे उत्पादन परदेशात निर्यात करत असून त्यांनी आपली स्वतःची एक खास ओळख निर्माण केली आहे.
सिन्नर औद्योगिक वसाहतीती उद्योजकांच्या विविध प्रश्नांबाबत निमा हाऊस सिन्नर येथे चर्चा करण्यात आली. ड्रेनेज सिस्टिम, डी झोनला मान्यता, मुख्य रस्त्याचे चौपदरीकरण, मुसळगाव माळेगाव लिंक रोड अशा अनेक समस्या अनेक दिवसांपासून प्रलंबित आहेत. उद्योजकांनी हे प्रश्न निमा मार्फत तातडीने सोडविण्यासाठी प्रयत्न करण्याची मागणी केली. त्यानुसार निमाचे उपाध्यक्ष आशिष नहार यांनी उपस्थित उद्योजकांना मार्गदर्शन करत यातील बरेच प्रश्न मंजुरीच्या अंतिम टप्प्यात असून लवकरच हे प्रश्न मार्गी लागणार असल्याची माहिती दिली.