सिन्नर (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – तालुक्यातील पास्ते येथे भक्ष्याच्या शोधार्थ निघालेला बिबट्या विहिरीत पडल्याची घटना घडली. शेतात काम करीत असलेल्या शेतकऱ्यावर झडप घालण्याच्या नादात बिबट्याच पाण्यात पडला. या बिबट्याचा शेतकऱ्याने सामना केला व हातात असलेल्या छत्री उघडली. त्यावेळी बिबट्या घाबरला व शेजारीच असलेल्या विहिरीत पडला.
ही घटना रविवारी दुपारी दीड वाजेच्या सुमारास पास्ते येथे घडली. मात्र, पाण्यात पडल्यानंतर चक्क बिबट्याने डरकाळी फोडत जीव वाचवण्यासाठी प्रयत्न केला. यावेळी येथील शेतकऱ्यांनी विहिरीत बाज टाकत या बिबट्याला वाचवायचा प्रयत्न केला. हा सगळा प्रकार कॅमेऱ्यात कैद झाला असून याचा व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहे.
देवळाली कॅम्पमध्ये पहाटे बिबट्या जेरबंद
नाशिक शहरातील देवळाली कॅम्प परिसरामध्ये आज सकाळी बिबट्या जेरबंद करण्यात आला आहे. त्यामुळे परिसरातील नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे