सिन्नर (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – तालुक्यातील गुळवंच येथे प्रियकराने प्रेयसीच्या मुलाला केलेल्या मारहाणीत चार वर्षीय बालकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. कृष्णा असे मृत बालकाचे नाव आहे. कृष्णाने शर्ट उलटा घातल्याची कुरापत काढत प्रियकराने काठीने मारहाण केली. यात कृष्णाच्या डोक्याला मार लागल्यामुळे त्याचा मृत्यू झाला.
निफाडमधील बोकडदरा येथून प्रियकर गणेश उर्फ अमोल नाना माळी व प्रेयसी काजल सिन्नर येथे पळून आले होते. हे दोघे पंधरा दिवसांपासून गुळवंच येथे संपत कांगणे या शेतकऱ्याकडे कामास होते. या ठिकाणीच किरकोळ कारणाने चार वर्षीय बालकाला काठी मारल्यामुळे मृत्यू झाला. ही काठी मारल्यानंतर या दोघांनी कृष्णाला खासगी रुग्णालयात नेले होते. पण, येथे डॅाक्टरांनी ग्रामीण रुग्णालयात नेण्याचे सांगितले. येथे नेल्यानंतर बालक मृत असल्याचे सांगितले. त्यानंतर अमोल माळी याने येथून पळ काढला.
दरम्यान या सर्व घटनेची माहिती डॉक्टरांनी एमआयडीसी पोलिसांना दिली. त्यानंतर पोलीस ग्रामीण रुग्णालयात दाखल झाले. येथे आई काजल हिने घडलेली घटना पोलिसांना सांगितली. पोलीस निरीक्षक शामराव निकम यांनी संशयित आरोपीला अवघ्या २४ तासात गजाआड केले.
⬜?⬜?⬜
*ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्या WhatsApp वर हव्यात❓*तर मग
*इंडिया दर्पण* च्या
दर्जेदार, विश्वासार्ह आणि गतिमान वृत्तसेवेचा लाभ घेण्यासाठी खालील ग्रुप जॉइन करा?https://t.co/hbtHdVcAG4— India Darpan Live (@IndiaDarpanLive) March 29, 2023
? *उन्हाळी सुटीत हरिद्वार, मसुरी, ऋषीकेश जायचंय?*
IRCTCचे हे टूर पॅकेज घ्या आणि मनमुराद आनंद लुटा…
https://t.co/OEJ6PJpvys#indiadarpanlive #irctc #heavenly #uttarakhand #tour #package #details #holiday #tourism #train— India Darpan Live (@IndiaDarpanLive) April 8, 2023
Nashik Sinner Crime Boy Friend Killed 4 Year Old Boy