मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – शिवसेना ठाकरे गट येत्या एक दोन दिवसात ६० ते ७० उमेदवारांची यादी घोषीत करण्याच्या तयारीत आहेत. विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीच्या काही जागांवर अंतिम निर्णय अद्याप झालेला नसला तरी ज्या जागेवर एकमत आहे. त्या जागेवर आता उमेदवार घोषीत केले जाणार आहे.
महाविकास आघाडीमध्ये सर्वाधिक जागा काँग्रेसकडे असणार असून त्यानंतर शिवसेना ठाकरे गट व राष्ट्रवादी शरद पवार गटाकडे जागा जाणार आहे. ठाकरे गटाच्या संभाव्य ३२ उमेदवारांची यादी समोर आली असून त्यात नाशिक जिल्ह्यातील तीन उमेदवार निश्चित झाले आहे. तर इतर नावाववर राष्ट्रवादी शरद पवार गट व शिवसेना ठाकरे गटात चर्चा झाली आहे.
नाशिक जिल्ह्यात निफाड – अनिल कदम, नाशिक पश्चिम – सुधाकर बडगुजर, मालेगाव बाह्य – अव्दैय हिरे यांचे नाव निश्चित आहे. अनिल कदम हे माजी आमदार आहे. तर सुधाकर बडगुजर हे जिल्हाप्रमुख आहेत. अव्दैर हिरे यांनी नाशिक जिल्हा बँकेसह विविध पदे भूषवले आहे. त्यांच्या घरात आमदार, मंत्रीपद अनेक वेळा अनेक दिग्गजांनी भूषविले आहे. शिवसेनेच्या पहिल्या यादीत हे तगडे उमेदवार घोषीत होणार आहे.