नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – शिवसेनेचे मुख्य नेते व महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा महाराष्ट्रभर “आभार दौरा” सुरू आहे. विधान सभा निवडणुकीत मिळालेल्या प्रचंड जनमताच्या विजयानंतर राज्यभरातील जनतेचे आभार मानण्यासाठी आपल्या कार्यकर्त्यांना, शिवसैनिकांना तसेच तमाम महाराष्ट्र वासियांना ते भेटत आहेत.
या दौऱ्याच्या निमित्ताने उपमुख्यमंत्री शिंदे नाशिक जिल्ह्यात येत असून, उद्या, १४ फेब्रुवारी रोजी नाशिक येथे भव्य सभा आयोजित करण्यात आली आहे.
गोल्फ क्लब मैदान येथे होणार आहे. या भव्य सभेच्या पूर्वतयारीची आज सविस्तर पाहणी शिवसेनेच्या पदाधिका-यांनी केली. सभेसाठी जय्यत तयारी सुरू सुरु असून, मोठ्या प्रमाणात जनसमुदाय उपस्थित राहील त्या अनुषंगाने आवश्यक उपाययोजना करण्यात आल्या आहे. त्याचप्रमाणे शहरभर स्वागताचे फलक लावण्यात आले आहे.
गोल्फ क्लब मैदानाची पाहणी करतांना मंत्री दादा भुसे, शिवसेना सचिव भाऊसाहेब चौधरी, माजी खासदार हेमंत गोडसे, उपनेते विजय अप्पा करंजकर, महानगरप्रमुख प्रवीण तिदमे, जिल्हाप्रमुख अजय बोरस्ते, विभागप्रमुख, तालुका प्रमुख तसेच सर्व पदाधिकारी उपस्थित होते.









