नाशिक – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नाशिक दौ-याची एकीकडे जोरदार तयारी असतांना दुसरीकडे शिवसैनिक हे शहर पोलीस आयुक्तालयावर मोर्चा काढण्याच्या तयारीत आहे. पण, नाशिक शहरात मनाई आदेश लागू झाल्याने या मोर्चाला परवाणगी मिळते का ? हा प्रश्न आहे. शिवसेनेच्या पदाधिकारी यांनी मध्य नाशिक विधानसभा प्रमुख निलेश कोकणे यांच्यावर झालेल्या हल्ल्याप्रकरणी पोलीस आयुक्तांची भेट घेतली. यावेळी
हल्लेखोरांवर त्वरित कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली. यावेळी पोलीस आयुक्तांनी लेखी आश्वासन न दिल्यास ३० जुलैला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दौऱ्याच्या दिवशी मोर्चा काढणार असल्याचे बोलले जात आहे. पोलीस आयुक्तांनी कारवाई करण्याचे लेखी आश्वासन दिले तर मोर्चा रद्द करण्याची शिवसेनेची भूमिका आहे.
हे आहे कारण
एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यानंतर त्यांच्या विरोधात निदर्शन करताना त्यांच्या समर्थकांनी लावलेल्या पोस्टरला काळे पासून निदर्शन केल्याने शिवसेना पदाधिकारी असलेले निलेश कोकणे यांच्यावर हा हल्ला केला होता. निलेश कोकणे यांच्यावर हल्ला केलेल्या हल्लेखोरांवर कारवाई करण्यासाठी शिवसेनेचे शिष्टमंडळ आयुक्तांना भेटले.