नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – मुंबई नाका येथील महामार्ग बसस्थानकावर उभ्या असलेल्या शिवशाही बसला अचानक आग लागल्याची घटना दुपारच्या सुमारास घडली. नाशिकहून बोरिवलीकडे ही शिवशाही बस निघत असताना ही घटना घडली. सुदैवाने बसमध्ये प्रवासी नसल्याने कुठलीही जीवितहानी झाली नाही.
ही घटना घडल्यानंतर काही क्षणात घटनास्थळी अग्निशमन दलाचे जवान तत्काळ दाखल झाल्याने आग नियंत्रणात आली. या आगीमागील कारण अद्याप स्पष्ट नसले तरी बसचे टायर फुटून ही आग लागल्याचे बोलले जात आहे. गेल्या काही दिवसात बसला आग लागण्याच्या घटना घडत असल्याचे समोर आले आहे.
Nashik Shivshahi Bus Caught Fire in Bus Stand Video