नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – शिवजन्मोत्सव साजरा करतांना कायदा व नियमांचे पालन करण्यात यावे, असे आवाहन राज्याचे बंदरे व खनिकर्म मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री दादाजी भुसे यांनी केले आहे. आज जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित शिवजन्मोत्सव आढावा बैठकीत ते बोलत होते.
यावेळी खासदार हेमंत गोडसे, जिल्हाधिकारी गंगाथरन डी., पोलीस आयुक्त अंकुश शिंदे, महानगरपालिका आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार, उपजिल्हाधिकारी भिमराज दराडे, पोलीस उपायुक्त किरणकुमार चौहान, पौर्णिमा चौघुले यांच्यासह जिल्ह्यातील मंडळांचे
पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी पालकमंत्री दादाजी भुसे म्हणाले की, शिवजन्मोत्सव साजरा करत असताना कोणताही अनुचित प्रकार घडून उत्सवास गालबोट लागणार नाही याची दक्षता घेण्यात यावी. तसेच मिरवणूक मार्गावरील रस्त्यांची दुरूस्ती, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, विद्युत व वाहतुक व्यवस्था चोख ठेवावी, असे निर्देशही संबंधित विभागांना पालकमंत्री दादाजी भुसे यांनी दिले आहेत.
Nashik Shivjanmotsav Meeting Guardian Minister