नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – तुम्ही जर नाशिक-शिर्डी महामार्गावरुन जाणार किंवा येणार असाल तर तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी आहे. कारण, या महामार्गावर आता टोल सुरू होणार आहे. त्यास मंजुरी मिळाली आहे. सिन्नर-शिर्डी मार्गावर पिपरवाडी येथे हा टोल असणार आहे.
सिन्नर-शिर्डी या 44.744 किलोमीटर लांबीच्या महामार्गाचे चौपदरीकरण पुर्ण झाले आहे. टोल वसुली करता भारत सरकारने राजपत्र क्र. का. आ. 158 (अ), दि. 10.01.2023 जारी केले आहे. त्यानुसार पिंपरवाडी (कि.मी. 28.300) येथे बांधण्यात आलेल्या टोल प्लाझावर टोलवसुली सुरू होणार आहे. उद्यापासून म्हणजेच १ एप्रिलपासून हा टोलनाका कार्यन्वित होणार आहे.
टोल प्लाझाच्या 20 कि.मी. पर्यतच्या परिसरात राहणाऱ्या अव्यावसायिक स्थानिकांच्या वाहनांसाठी 2023-24 या वर्षासाठी मासिक पासचे दर रू. 330/- असे राहणार आहे. राष्ट्रीय महामार्ग विभागातर्फे टोलच्या 20 कि. मी. परिघातील नागरीकांना आवाहन करण्यात येत आहे की, टोल फी मधील सवलतीचा लाभ घ्यावा. त्यासाठी आवश्यक ती (गाडीचे नोंदणी प्रमाणपत्र पुस्तिका, आधारकार्ड, इ.) कागदपत्रे टोल प्लाझा कार्यालयात सादर करावीत. आपली गाडी स्थानिक श्रेणी नोंदणी करून घ्यावी. कृपया नोंद घ्यावी की, सदरील टोल फी सवलत ‘फास्टॅग‘ द्वारेच उपलब्ध आहे, असे कळविण्यात आले आहे.
टोल प्लाझावर आकारले जाणारे पैसे
अनु. क्र….. वाहनांचा प्रकार… एकेरी फेरी… शुल्क रूपयांत
1. कार/जीप/व्हॅन/ एलएमव्ही… 75… 115… 2575… 40
2. एलसीव्ही/एलजीव्ही/ मिनी बस…125… 185…. 4155…. 65
3. बस/ट्रक… 260…. 390… 8710… 130
4. 3 अॅक्सल कमर्षियल वाहन ….285…. 425…. 9500….140
5. एचसीएम/इएमइ/एमएव्ही (4 ते 6 अॅक्सल)… 410… 615… 13655… 205
6. अवजड वाहन (7 किंवा अधिक अॅक्सल)… 500… 750…16625… 250
एकाहून अधिक खेपांसाठी (एक दिवसात जास्तीत जास्त 2 एकेरी खेपांसाठी शुल्क रूपयांत)
मासिक पास एकाच महिन्यातील 50 एकेरी फेऱ्यांसाठी शुल्क रूपयांत
जिल्ह्यातील नोंदणीकृत व्यावसायिक वाहनांसाठी शुल्क रूपयांत
Nashik Shirdi Highway Toll Naka from 1 April 2023