नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – देवळालीगावात शिवजयंतीच्या बैठकी दरम्यान शाब्दिक चकमक झाल्यानंतर शिंदे गट व ठाकरे गट आमने – सामने आले. यावेळी हाणामारी होऊन राडा झाल्याची प्राथमिक माहिती हाती आली आहे. यावेळी एकाने हवेत गोळीबार केला गोला. त्यानंतर दोन्ही गट आक्रमक झालेले असतांना पोलिस या ठिकाणी दाखल झाले. त्यांनी जमावाला पांगविण्यासाठी लाठीमार केला. दरम्यान, देवळालीगावात दंगाविरोधी पथक दाखल झाले आहे. गाावातील गणेश मंदिर ही बैठक होती. यावेळी ही घटना घडली. या घटनेमुळे तणावाचे वातावरण तयार झाले नागरिकांमध्ये दहशत निर्माण झाली आहे.या राड्याची घटना घडल्यानंतर आजूबाजूची दुकाने बंद झाली.
या राड्यात दोन्ही गट तलवारी कोयते, लाठ्या काठ्या काढून एकमेकांवर धाऊन आल्यामुळे वातावरण चांगलेच तापले. शिवसेनेचा बालेकिल्ल्यात शिवसेनेत पडलेल्या फूटीतून ही घटना घडली. उपनगरचे सहाय्य पोलिस निरीक्षक सचिन चौधरी यांनी दोन्ही गटाला समजाविण्याचा पहिले प्रयत्न केला. पण, दोन्ही गटांनी आरोपी प्रत्यारोप सुरुच ठेवल्यामुळे चौधरी यांनी वरिष्ठांना कळवले. त्यानतंर पोलिस उपायुक्त चंद्रकांत खांडवी, सहाय्यक आयुक्त सिध्देश्वर धुमाळ, उपनगरचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक माईनकर, नाशिकरोडचे अनिल शिंदे, देवळाली कॅम्पचे कुंदन जाधव तातडीने दाखल झाले. या राड्यानंतर काही राजकीय पक्षांच्या पदाधिका-यांनी मध्यस्थीचा प्रयत्न केला.
https://twitter.com/IndiaDarpanLive/status/1616336386973630464?s=20&t=bCQZ1IPLL__Inn7eNIv4-g
Nashik Shinde And Thackeray Group Fight Firing Tense Situation