नाशिक – दिवाळीच्या सुट्यांसंदर्भात नाशिक शिक्षणाधिकाऱ्यांनी महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे शिक्षक, विद्यार्थी व पालकांना मोठा दिलासा मिळाला आहे. यासंदर्भात मुख्याध्यापक संघ, शिक्षक भारती, टीडीएफ व माध्यमिक शिक्षक संघ यांनी शिक्षणाधिकाऱ्यांची आज भेट घेतली.
नाशिक जिल्ह्यातील शाळांना आता २० नोव्हेंबरपर्यंत सुटी राहणार आहे. त्यामुळेच शाळा २२ नोव्हेंबरपासून पासून सुरू होणार आहेत. मुख्याध्यापक संघ , शिक्षक भारती,टी डी एफ व माध्यमिक शिक्षक संघ यांच्या आवाहनाला शिक्षणाधिकारी एम. व्ही. कदम यांनी प्रतिसाद दिला. सुटीचा कालावधी २० नोव्हेंबरपर्यंत वाढवली आहे. येत्या २२ नोव्हेंबर पासून शाळा सुरू होतील, असे पत्रक ही लगेच काढण्यात येईल. जिथे NAS परीक्षा असतील त्या दिवशीच्या सुट्या नाताळ मध्ये त्यांनी घ्याव्यात, असेही सांगण्यात आले आहे. यावेळी गुलाबराव भामरे, के के अहिरे, आर डी निकम,निलेश ठाकूर,एन एन खैरनार सचिन शेवाळे, सचिन देशमुख,एम टी घोडके, संग्राम करंजकर, समाधान निम्डे, गोकूळ चव्हाण,एम व्ही बोराडे, अनिल खालकर, रमेश वडजे, दीपक ह्यालीज, यावेळी संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.