नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान कदापिही सहन करणार नाही. असा स्पष्ट इशारा केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी दिला आहे. भाजप आमदार राहुल ढिकले यांच्या नेतृत्वात ढोल ताशांच्या गजरात सावरकर गौरव यात्रा काढण्यात आली.
नाशिक शहराजवळील भगूर येथे सावरकरांचे जन्मस्थान आहे. तेथूनच सावरकर गौरव यात्रा काढण्यात आली. यावेळी डॉ. पवार म्हणाल्या की, नाशिककरांना त्याचा अभिमान आहे. मात्र दुसरीकडे गेल्या काही दिवसांपासून राहुल गांधी यांच्यासह काँग्रेसकडून वारंवार सावरकरांचा अपमान होत असल्याचे डॉ. पवार म्हणाल्या. आज सकाळी भाजपा कार्यालयापासून सावरकर गौरव यात्रेला प्रारंभ झाला. यात नाशिकमधील अनेक नागरिकांसह महिला वर्गाने सहभाग घेतला.
Nashik Savarkar Gaurav Yatra BJP