विशेष प्रतिनिधी, नाशिक
येथील सार्वजनिक वाचनालय लवकरच कात टाकणार आहे. अत्याधुनिक वेबसाईट, लायब्ररी ऑन व्हील, ई पुस्तकालय अशा बहुविध प्रकारच्या सेवा लवकरच वाचकांना मिळणार आहेत. काळाशी सुसंगत बदल करुन वाचकांसाठी सावाना नाविन्यपूर्ण सेवा रुजू करणार आहे.
सार्वजनिक वाचनालयाने साहित्य, कला, शिक्षण आदी क्षेत्रात विविध उपक्रमांनी सातत्याने योगदान दिले आहे.सरस्वतीच्या दरबारातील ही सेवा मयूरपखांच्या विविधरंग़ी दिमाखदार पैलूंनी नटली आहे.
वाचनालयचा प्राण असलेला देवघेव विभाग स्व. माधवराव लिमये सभागृहात स्थलांतरीत करण्यात येत असताना अद्ययावत करण्यात आला आहे. प्रत्येक वाचकाला पुस्तकापर्यत जाता येईल व हवे असलेले पुस्तक निवडता येईल. या विभागासाठी दानशूर दापत्य डॉ.नेलींकर कुटुंबीय यांनी रु. ११ लक्ष ची देणगी घोषित केले होती. त्या पैकी त्यांनी ६ लक्ष रुपयांचा निधी दिला आहे. हा अद्ययावत देवघेव विभाग लवकरच वाचकांसाठी सुरु होणार आहे. यामध्ये ई-पुस्तकालयाचीही सुविधा असणार आहे.
संस्थेने संस्कृती मंत्रालयाच्या राष्ट्रीय पांडुलिपी मिशन या प्रकल्पाअंतर्गत सार्वजनिक वाचनालय नासिक येथील दहा हजार पोथ्यांच्या तब्बल ७ लाख पत्रांचे संगणकीकरण पूर्ण केले आहे. हे काम जवळपास ५० लाखचे काम पूर्ण झाले आहे.
सावानात मुक्तविद्यापिठाचे बी.लिब. व एम.लिब.केद्र असून सावानात सशोधन केद्र सुरु करण्याचा प्रयत्न आहे तसेच सावानाची वेबसाईट तयार करण्याचे काम चालु आहे. नाशिकचे संपूर्ण दस्तऐवज जतन करण्याचे काम व सर्वांपर्यन्त पोहचवीणे हा उद्धेश आहे.
