नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – शहरात एका खासगी कंपनीच्या छतावरून पडून कामगाराचा मृत्यू झाला आहे. सातपूर औद्योगिक वसाहतीमध्ये आज दुपारच्या सुमारास ही दुर्घटना घडली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सातपूर औद्योगिक वसाहतीत जेबीएम कंपनीमध्ये सोलरचे काम सुरु होते. त्याचवेळी एका मजुराचा पत्र्यावरून पडून मृत्यू झाल्याची घटना घडली. संजय यादव असे या परप्रांतीय मजूराचे नाव असल्याचे समजते. कंपनीच्या कामगारांनी तातडीने माहिती दिली. त्यानंतर घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. यानंतर रुग्णवाहिकेतून मजुरास शासकीय रूग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यास तपासून मृत घोषित केले.