नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – सातपुरमध्ये झालेल्या दुहेरी हत्याकांडातील संशयीत आरोपींची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. २०१६ साली ही घटना घडली होती. यानंतर पोलिसांनी भूषण लोंढे सह आठ जणांना अटक करण्यात आली होती. आज याचा निकाल लागला असून भूषण लोंढे सह सात जणांची निर्दोष मुक्तता करण्यात आली तर वतन पवार यांच्याकडे कट्टा बंदूक सापडल्याने त्याला आर्म्स ऍक्ट नुसार तीन वर्षांनी शिक्षा सुनावण्यात आली आहे. आठ पैकी पाच जण हे नाशिकरोडच्या सेंट्रल जेल मध्ये होते तर तीन जणांची जामिनावर सुटका झाली होती.
या घटनेबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, ३१ डिसेंबर २०१५ ला वैतरणा धरणावरील हॉटेल पिकनिक पॉईंटवर प्रिन्स सिंगच्या वाढदिवसानिमित्त पार्टी होती. या पार्टीत वाध झाल्यानंतर सराईत गुन्हेगार आव्हाड व गवळे या दोघांची सातपूरमध्ये गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. यानंतर या दोघांचे मृतदेह एन्डिव्हर फोर्ड कारमध्ये (एमएच १४, बीएफ १२१२) टाकून जव्हार रोडलगत तोरंगण घाटातील दरीत फेकून देण्यात आले होते.
या प्रकरणी त्र्यंबकेश्वर पोलिसांनी पीएल ग्रुपचे सदस्य प्रिन्स चित्रसेन सिंग, सनी ऊर्फ ललित अशोक विठ्ठलकर, निखिल मधुकर निकुंभ, वतन शिवाजी पवार व किशोर गायकवाड या पाच संशयितांना अटक केली. भूषण लोढेंचा २२ जानेवारीला विवाह असल्याने हायकोर्टाने त्यास तीन दिवसांचा जामीन मंजूर केला होता. मात्र, जामिनाची मुदत संपताच भूषण पुन्हा फरार झाला. पण, त्याला नंतर अटक केली होती.