सटाणा (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – शेतकरी सध्या प्रचंड अडचणीत असून त्याच्या समस्या काही कमी होताना दिसत नाही. त्यातच लाचखोरही शेतकऱ्यांची परीक्षा पाहत असल्याचे दिसून येते. मात्र, तालुक्यातील एका शेतकऱ्याने महावितरणच्या कर्मचाऱ्याला चांलगाच धडा शिकविला आहे. हेमंत विठ्ठल खैरनार उर्फ पप्पू असे लाचखोर कर्मचाऱ्याचे नाव आहे. तो जोरण येथील विद्युत उप केंद्रात पद- वरिष्ठ तंत्रज्ञ म्हणून कार्यरत आहे. तब्बल ३० हजार रुपयांची लाच घेताना तो पकडला गेला आहे.
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) दिलेल्या माहितीनुसार, एका शेतकख्याच्या शेताजवळील सार्वजनिक डीपी जळाली. त्यामुळे त्याच्या शेतातील डाळिंब बागेचे पाण्याशिवाय नुकसान होत होते. येथे नवीन डीपी बसविणे आवश्यक होते. परिमामी, या शेतकऱ्याने जोरणच्या उपकेंद्रात भेट देऊन मागणी केली. सार्वजनिक इलेक्ट्रिक नवीन डीपी बसून देण्याचे मोबदल्यात लाचखोर पप्पू खैरनार याने ३० हजार रुपये आणि केबल लावण्याचे मोबदल्यात २ हजार रुपये असे एकूण ३२ हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली. अखेर तडजोडी अंती लाचखोर खैरनारने ३० हजार रुपये घेण्याचे मान्य केले. याप्रकरणी एसीबीकडे तक्रार आली. एसीबीने सापळा रचला आणि त्यात खैरनार रंगेगाथ सापडला. आता त्याच्यावर गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु आहे.
अधिक माहिती अशी
*सापळा अधिकारी* श्रीमती साधना इंगळे , पोलीस निरीक्षक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, नाशिक मो.न. 9881473083
*सापळा पथक*
– पो.हवा.सचिन गोसावी. पो.हवा. प्रफुल्ल माळी. चा.पो.हवा. विनोद पवार
**मार्गदर्शक* –
**मा.श्रीमती शर्मिष्ठा घारगे-वालावलकर* पोलीस अधीक्षक, ला.प्र.वि, नाशिक परीक्षेत्र,नाशिक मो.न. 9371957391
**मा.श्री. नरेंद्र पवार* वाचक, पोलीस उपअधीक्षक, पोलीस अधीक्षक कार्यालय ,ला.प्र.वि. नाशिक. मो.न. 9822627288.
*सर्व नागरीकांना आवाहन करण्यात येते की,त्यांच्याकडे कोणत्याही शासकीय अधिकारी/कर्मचारी यांनी किंवा त्यांच्या वतीने खाजगी इसमाने त्यांचे कोणतेही शासकीय काम करून देण्यासाठी अथवा करून दिल्याचे मोबदल्यात लाचेची मागणी केल्यास तात्काळ लाचलुचपत प्रतिबंधक विभाग,नाशिक येथे संपर्क करावा.
दूरध्वनी क्रमांक-
02532578230,
02532575628
*टोल फ्री क्रमांक १०६४ .*