सटाणा (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – बागलाण तालुक्यातील नामपूर भागातील मोराणे(सांडस) येथील शेतमजुरी करणाऱ्या पती- पत्नीने शेतातील झाडाला गळफास घेत आपली जीवनयात्रा संपवली. दीपक सुरेश अहिरे (वय २४) रेखाबाई दीपक अहिरे (वय १९) अशी त्यांची नावे आहेत. या दोघांचा दोनच महिन्यापूर्वी विवाह झाला होता.
शेतमजूर म्हणून हे दाम्पंत्य आले होते. याप्रकरणी जायखेडा पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. सोमवारी या दाम्पत्याने नामपूर शिवारात बाबुराव आनंदराव सावंत यांच्या शेताच्या बांधावर असलेल्या बाभळीच्या झाडाला साडीच्या साहाय्याने गळफास घेत आत्महत्या केली. या आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. या दोघांमध्ये विवाहावरून वाद सुरु असल्याचे समजते. दोघांचाही विवाहाला विरोध असल्याने पटत असा प्राथमिक अंदाज आहे. मृत रेखाबाई हिचे माहेर धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यातील दमणार येथील आहे.